Saturday, December 21, 2024
Homeबातम्याअनोखा विवाह सोहळा : वधूने लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन

अनोखा विवाह सोहळा : वधूने लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन

संस्कृती तहकीक – प्रतीक चिमणे यांचा विवाह सोहळा

छत्रपती संभाजीनगर – एखाद्या विवाह प्रसंगी वधूने लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे , असा विवाह सोहळा तुम्ही कधी अनुभवला आहे का? होय, असे घडू शकते. संस्कृती तहकीक या वधून लिहिलेल्या ‘ जे पीड परायी जाने रे ‘ या आरोग्य विषयक ग्रंथाचे प्रकाशन तिच्या विवाह सोहळ्यात होण्याचा अनोखा उपक्रम 9 जुलै 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे .

लेखिका डॉ. संस्कृती तहकीक

छत्रपती संभाजीनगर येथे दै .लोकपत्रचे संपादक म्हणून कार्यरत ‘ असलेले रविंद्र तहकीक यांची कन्या डॉ .संस्कृती आणि हिंगोली येथील दंत वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ . तुळशीराम चिमणे यांत्रे पुत्र अभियंता प्रतीक यांचा विवाह 9 जुलै 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता, शिवनेरी लॉन्स (केंब्रिज शाळेजवळ ) जालना रोड , संभाजीनगर येथे होत आहे .

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ , संभाजीनगर येथे फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ .संस्कृती तहकीक यांनी दै लोकपत्र मध्ये फिजिओथेरेपीवर लेख लिहिले आहेत . भौतिकोपचारशास्त्र ( फिजिओथेरेपी) ही अनेक आजारांवर उपयुक्त असलेली उपचार पध्दती आहे यासंदर्भात माहिती देणारे विविध लेख त्यांनी लिहिले. या लेखांचा  एकत्रित संग्रह असलेला ‘रे पीड व परायी जाने रे ‘ हा ग्रंथ या विवाह कार्यकमात प्रकाशित होणार आहे . फिजिओथेरेपी ही पॅरामेडिकलची शाखा नसून, ती स्वतंत्र वैद्यकीय अभ्यास , संशोधन व वैद्यकीय उपचार पद्धती आहे हे त्यांनी या ग्रंथाद्वारे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे . हा ग्रंथ महिला आणि पुरुषांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन करणारा आहे . एमजीएम चे संस्थापक अंकुशराव कदम यांचे प्रोत्साहन या ग्रंथलेखनास लाभले असे डॉ . संस्कृती यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले . या सोहळयास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

विवाह सोहळ्यात वधूने लिहिलेल्या आरोग्य विषयक ग्रंथाचे प्रकाशन होणे हा अनोखा व स्तुत्य उपक्रम असल्याने अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments