Thursday, December 12, 2024
Homeमहिलातुरुंगात असूनही नोबेल पुरस्कार मिळालेल्या महिलेला तुम्ही ओळखता का? 

तुरुंगात असूनही नोबेल पुरस्कार मिळालेल्या महिलेला तुम्ही ओळखता का? 

अन्यायाचा प्रतिकार केल्याने एकतीस वर्षे तुरुंगवास भोगणा-या आणि आताही तुरुंगात असतानाही शांततेचा नोबेल पुरस्कार  मिळालेल्या महिलेचे नाव तुम्हाला ठाऊक आहे का? या महिला आहेत नर्गिस मोहम्मदी आणि त्या इराणमध्ये तुरुंगवास भोगत आहेत.

नोबेल शांतता पुरस्काराने त्यांना  सन्मानित करण्यात आले .हा पुरस्कार घ्यायला देखील त्यांना इराण सरकारने सोडले नाही.  मोहम्मदी यांचे पती, तागी रहमानी, त्यांच्या 17 वर्षाच्या दोन जुळ्या मुलांसह पॅरिसमध्ये निर्वासित राहतात, या जुळ्या मुलांनी आईच्या वतीने हा नोबेल पुरस्कार स्वीकारला  . 

तागी रहमानी 11 वर्षांपासून त्यांच्या पत्नीला पाहू शकले नाहीत आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या आईला सात वर्षांपासून पाहिले नाही, मुलगा अली रहमानी म्हणाला  की नोबेल केवळ त्याच्या आईसाठी नाही,  संघर्षासाठी आहे.”

नर्गिसचा जन्म 21एप्रिल 1972 रोजी इराणमधील कुर्दिस्तानमधील झांजन शहरात झाला. त्यांचे वडील शेतकरी आणि आई राजकीय कुटुंबातील होती.1979 मध्ये इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर, त्यांचे काका आणि दोन चुलत भावांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगात टाकले. 

नर्गिस यांनी  न्यूक्लियर फिजिक्सचा अभ्यास केला आहे आणि काही काळ अभियंता म्हणूनही काम केले आहे. एका मुलाखतीत नर्गिस यांनी  सांगितले होते की, जेव्हा त्या 9 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या चुलत भावांना तुरुंगात टाकण्यात आले होते. इराण सरकार रोज एका कैद्याला फाशी देत ​​असे, ज्याचे नाव टीव्हीवर जाहीर केले जात असे. एके दिवशी त्याच्या भावाचे नावही टीव्हीवर दाखवण्यात आले, ते ऐकून त्याची आई बेशुद्ध झाली.

या घटनेने नर्गिसला धक्का बसला आणि त्यांनी फाशीची शिक्षा संपवण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

नर्गिस यांची  अभ्यासादरम्यान तागी रहमानीची भेट झाली. तागी इराणच्या बौद्धिक जगतात खूप प्रसिद्ध होते. नंतर नर्गिस यांनी  तागीशी लग्न केले आणि दोघेही तेहरानमध्ये राहू लागले. त्यांना जुळी मुले आहेत.

याच काळात नर्गिस यांनी  वर्तमानपत्रात लेख लिहायला सुरुवात केली. सरकारी छळामुळे नर्गिसच्या पतीने दोन्ही मुलांसह देश सोडला आणि सध्या तो फ्रान्समध्ये निर्वासित जीवन जगत आहेत.

नर्गिस महिलांच्या हक्कांसाठी, फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी आणि इराणमधील तुरुंगातील परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत  आहेत.2000 च्या दशकात, नर्गिस नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या इराणी वकील शिरीन एबादी यांनी स्थापन केलेल्या सेंटर फॉर ह्युमन राइट्स डिफेंडर्समध्ये सामील झाल्या.2008 मध्ये सरकारने नर्गिसला त्रास देण्याच्या उद्देशाने अभियंता पदावरून काढून टाकले .नर्गिस यांना .इराणमधील राजवटीने  13 वेळा अटक केली आहे, तिला पाच वेळा दोषी ठरवले आहे आणि एकूण 31 वर्षांचा तुरुंगवास आणि 154 फटके मारले आहेत. त्या आता 51 वर्षाच्या आहेत.  आजही तिथल्या तुरुंगात एकांतवासाची शिक्षा त्या मोगत आहेत. एकांतवास म्हणजे किती भयानक असतो हे त्यांनी पुस्तकात सांगितले आहे , जिथे कोणाचाच आवाज येत नाही. कोठडीत असलेल्या एका छोट्या खिडकीतून फक्त दिवस रात्र समजण्यापुरता उजेड पडतोय. अंधाऱ्या भिंती. राहण्याची , बाथरूमची सोय नाही. घरच्यांना भेटण्याची परवानगी नाही.   देशातील इराणी महिला कैद्यांच्या मुलाखतींवर आधारित ‘व्हाइट टॉर्चर’ हे पुस्तक नर्गिस यांनी लिहिले आहे.मुलाखती द्वारे इराणी महिला कैद्यांचे जीवन जगासमोर मांडले म्हणून  इराणी सरकारने नर्गिस यांची  तुरुंगवासाची शिक्षा अजून वाढवली आहे. प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे. 

पुस्तक : व्हाईट टॉर्चर

लेखिका : नर्गिस मोहम्मदी 

किंमत : 300 रु 

संपर्क : 088304 66300

New Era Publishing House

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments