Sunday, December 22, 2024
Homeबातम्यानेटक-यांचा जिओ वर संताप,मीम्स चा पाऊस

नेटक-यांचा जिओ वर संताप,मीम्स चा पाऊस

मुंबई – भारतातले नेटकरी ‘जिओ ‘ कंपनीवर खूप संतापले आहेत . अनंत – राधिकाच्या लग्नाच्या प्रचंड खर्चाचे लगान आमच्याकडून का वसूल करता? असा प्रश्न विचारणारे अनेक मीम्स टाकून नेटकऱ्यांनी धमाल उडवून दिली आहे .नेटवर ‘बायकॉट जिओ ‘ हा ट्रेंड जोरात आहे .

5जी चा दावा करून व पैसे घेऊन 3जी ची गती का?, महिना 30 दिवसांचा असतो, पण रिचार्जला तुमचा महिना 28 दिवसांचा का असतो?, जर सिम अनंतकाळासाठी दिले तर इनकमिंग फोन बंद का ? असे प्रश्न हंसराज मीना या नेटकऱ्याने विचारले आहेत .

“ मुकेशअंबानी के लडके अनंत अंबानी की शादी का निमंत्रण किसी को मिला या ना मिला हो, पर शगुन पुरे देश को देना पड रहा है “ अस एम.ए अहमद चा नेटकऱ्याने म्हटले आहे .

जिओ ने पहिल्यांदा फुकट डाटा देऊन लोकांना सवय लावली मग हळू – हळू रिचार्जची किंमत वाढवित नेली . आता आम्हालाही जिओ पासून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे आदिराज पटेल या नेटकऱ्याने म्हटले आहे .

‘रावण में लाख बुराईयाँ हो मगर उसने रिचार्ज महंगा करके बेटो की शादी नही करवाई थी’ असे प्रियंका ठाकूरने रावणाचा फोटो टाकत म्हटले आहे .राधिका एस . के यांनी रिचार्ज किमती वाढल्यावर अंबानी परिवार ओम शांती ओम हे गाणे म्हणत आनंदाने नाचणारा अंबानी परिवाराचा व्हिडिओ टाकला आहे .

पंगतीत वाढण्याऐवजी  जेवायला बसलेल्या प्रत्येकाच्या ताटातून लाडू काढून घेत प्रत्येकाला मुकेश अंबानी नम्रपणे नमस्कार करीत आहेत असे योगेंद्र शंकरवार या नेटकऱ्याने टाकलेल्या व्हिडिओत दिसते .

पैसे बढा कर मारना ही था तो JIO नाम क्यू रखा? असा प्रश्न रामकुमार चाहिल या नेटक-याने विचारला आहे.

रिचार्ज महंगा हो गया है गाईज, इस लिये मै कबुतर ले के जा रहा हूॅं , अब चिठ्ठी से बात करेंगे असे म्हणत अजय जोनवाल या नेटक-याने मजेशीर मीम टाकले आहे. 

जॅकी यादव या नेटक-याने मजेशीर पोष्ट केली आहे. बायकॉट जिओ असा हॅशटॅग लावत त्याने म्हटले आहे’आयपीएल येण्याआधी अंबानी कडे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम सुरु होते नंतर आयपीएल संपले,  लोकसभा सुरु होऊन संपल्या , वर्ल्ड कप सुरु होऊन संपला , आता अलिंम्पिक येणार आहे, तरी यांच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम सुरुच आहे .

सत्या यादव या नेटक-यानेही खूप गमतीदार मीम टाकले आहे. राधिका अनंतला म्हणते ‘सुना है , हमारी शादी के लिये पूरा देश चंदा दे रहा है. अनंत त्यावर म्हणतात उसे चंदा नही रिचार्ज करते है पगली’.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments