Tuesday, January 21, 2025
Homeपर्यावरणपाणी समस्येवर 'हिम स्तूप' हा नवा उपाय

पाणी समस्येवर ‘हिम स्तूप’ हा नवा उपाय

सोनम वांगचूक यांचा लडाखमधील लोकांसाठी अनोखा शोध

कारगिल – लडाख प्रांतातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पर्यावरण तज्ञ सोनम वांगचूक यांनी ‘हिम स्तूप ‘ हा नवा शोध लावला आहे. हा उपाय सर्वसामान्यांना समजावा आणि त्यांनी तो अमलात आणावा यासाठी हिम स्तूप बनविण्याची स्पर्धाही आयोजित केली होती.

जेव्हा सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये लोकांना त्यांच्या मूलभूत पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडताना पाहिले, तेव्हा त्यांनी जास्त काळ पाणी साठवण्यासाठी उभ्या बर्फाचे स्तूप तयार करण्याचा उपाय शोधला. सरासरी स्तूप 35 मीटर ते 40 मीटर उंच आहे आणि 16 हजार घन लिटर पाणी साठवू शकतो जे 10 हेक्टर जमिनीला सिंचन करण्यासाठी पुरेसे आहे. लडाखच्या पाण्याच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी वांगचुक अशा 80-90 स्तूप तयार करण्याची योजना आखत आहेत.
लडाखचे सुंदर पर्वत हे एक चित्तथरारक दृश्य आहे आणि पर्यटकांसाठी एक संस्मरणीय अनुभव आहे. परंतु जे येथे कायमचे स्थायिक झाले आहेत आणि या कोरड्या आणि थंड पर्वतांमध्ये संघर्ष करीत आहेत त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते .नापीक जमीन आणि नियमित पाण्याच्या स्त्रोतांचा अभाव यामुळे लडाख प्रांतातील नागरिकांचे जीवनमान आणखी कठीण झाले आहे. हिमनद्यांचे पाणी, ज्याची प्रत्येक शेतकऱ्याला गरज असते, हा एकमेव उपाय आहे, परंतु या हिमनद्या वर्षातील बहुतांश काळ गोठलेल्या असतात.
चेवांग नॉरफेल यांनी कृत्रिम हिमनद्या तयार करुन समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी हा उपाय व्यवहार्य दिसत असला आणि लडाखच्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली असली तरी या उपायांसाठी काही आव्हाने होती.कृत्रिम हिमनद्या खूप उंचीवर बांधल्या गेल्या होत्या आणि गावकरी किंवा कामगार इतक्या उंचीवर चढण्यास नाखूष होते.

लडाखमधील यांत्रिक अभियंता सोनम वांगचुक यांनी चेवांग नॉर्फेलच्या कृत्रिम हिमनद्या तयार करण्याच्या कार्यातून प्रेरणा घेतली आणि ही कल्पना अधिक यशस्वी करण्यासाठी मदत करण्याचा विचार केला. आपण गावातच हिमनद्या का बांधू शकत नाही. पाणी गोठवून ठेवण्यासाठी तापमान पुरेसे कमी आहे-आम्हाला ही हिमनद्या तयार करण्यासाठी फक्त एक स्मार्ट मार्ग हवा होता , तो हिम स्तूपामध्ये सापडला “, असे वांगचुक म्हणतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments