Monday, October 7, 2024
Homeपत्रकारिताप्रणव रॉय विरुद्ध सात वर्षात काहीच पुरावा सापडला नाही

प्रणव रॉय विरुद्ध सात वर्षात काहीच पुरावा सापडला नाही

सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर

नवी दिल्ली – तब्बल सात वर्ष प्रयत्न करूनही एनडीटीव्हीचे माजी संस्थापक आणि संचालक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याविरुद्ध काहीच पुरावा सापडला नाही त्यामुळे सीबीआय न ने 1ऑक्टोबर 2024 रोजी सदर प्रकरणाचा तपास थांबवला .

प्रणय रॉय यांनी भारतात एनडीटीव्ही च्या माध्यमातून चांगली पत्रकारिता रुजवण्याचे कार्य केले .एनडीटीव्हीचा भारतामध्ये दबदबा निर्माण केला . 2014 नंतर एनडीटीव्हीकडे सरकारची वक्रदृष्टी होती .अखेरीस 2017 मध्ये एनडीटीव्ही च्या विरोधात फसवणुकीचा एक खटला दाखल झाला याप्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात आला होता .

हे प्रकरण 2017 मध्ये सुरू झाले. क्वांटम सिक्युरिटीज लिमिटेडच्या संजय दत्त या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने एफआयआर नोंदवला होता. रॉयशी संबंधित असलेल्या आरआरपीआर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने इंडिया बुल्सकडून ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या विरोधात कथित फसवणुकीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला . रॉय यांच्यामुळे आयसीआयसीआय बँकेला 48 कोटींच्या तो टा झाला असा आरोप होता त्याबाबत सीबीआयला कायदेशीरदृष्ट्या योग्य पुरावा सापडला नाही. प्रणय रॉय यांनी 2009 मध्ये कर्जाची पूर्तता केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .

एफआयआर नुसार, आरआरपीआर होल्डिंग्सने इंडिया बुल्सच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आयसी आयसीआय बँकेकडून वार्षिक 19 टक्के व्याज दराने 375 कोटीचे कर्ज घेतले.तक्रारीत असा आरोप आहे की रॉयने या कर्जासाठी त्यांचे संपूर्ण शेअरहोल्डिंग तारण म्हणून गहाण ठेवले, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), स्टॉक एक्स्चेंज किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला या तारणाचा अहवाल दिला नाही.

या खटल्यात अडकलेल्या आणि जेरीस आलेल्या रॉय दाम्पत्याने अखेरीस 2022 मध्ये, अदानी समूहाला एनडीटीवी मधील कंट्रोलिंग स्टेक विकले, त्यानंतर प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला प्रणव रॉय यांचा पत्रकारितेतील र दबदबा थंडावला .आता सीबीआयलाही उपरती झाली आहे . सात वर्षात पण प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्या विरोधात आम्हाला फसवणुकीच्या कुठलाही पुरावा सापडलेला नाही त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करीत आहोत असे सीबीआय ने स्पष्ट केले आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments