Thursday, October 3, 2024
Homeअर्थकारणभारतातील तीन टक्के लोकच भरतात आयकर

भारतातील तीन टक्के लोकच भरतात आयकर

मुंबई- भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा अधिक असली तरी अवघे तीन टक्के लोकच आयकर भरतात हे वास्तव धक्कदायक आहे. यात सर्वात जास्त भरडला जातो मध्य्मवर्गीय माणूस .

आयकर ( इनकम टॅक्स ) विवरण पत्रे भरणारांची संख्या 2023-24 या वर्षात 8 कोटी 18 लाख झाली असून ही विक्रमी वाढ आहे असे प्राप्तिकर खात्याने नमूद केले आहे. 2022-23 मद्ये विवरण पत्रे भरणा-यांची संख्या 7 कोटी 50 लाख होती. जमा झालेल्या विवरणपत्रात गतवर्षीच्या तुलनेत 9 टक्के वाढ झाली आहे. आयकरापोटी सरकारकडे जमा झालेल्या रकमेतही वाढ झाली असून इतकी रक्कम आयकराव्दारे जमा झाली आहे. या आकडेवारीवरुन भारतातील खूप लोक आयकराव्दारे भरतात असे आपणास वाटू शकते. मात्र वास्तवात देशातील अवघे तीन टक्के लोकच आयकर भरतात असे आकडेवारीतून स्पष्ट होते.

तीन टक्के लोकच कर भरताात

देशाची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा अधिक असली तरी भारतात यावर्षी आयकर विवरणपत्र भरलेल्यांची संख्या अवघी 8 कोटी 18 लाख आहे. त्यातील 70 टक्के लोकांना आयकरातून सवलत मिळते, याचा अर्थ हे लोक शून्य टक्के आयकर भरतात. प्रत्यक्षात आयकर भरणा-यांची टक्केवारी 3 टक्केपेक्षा कमी आहे. भरपूर उत्पन्न असूनही भारतातील बरेच लोक खरे उत्पन्न लपवतातआणि आयकर भरीत नाहीत.

भारतात 3% प्रौढ लोकसंख्या आयकरदाते आहेत. काही इतर विकसित देशांसाठी तत्सम तुलनात्मक %आहेत – फ्रान्स 78.3%, यूएसए 50.1%, जर्मनी 61.3%, यूके 59.7%. कर टाळणे हा मानवी स्वभाव आहे. फारच कमी लोकांना त्यांच्या देशवासियांच्या फायद्यासाठी कर भरावासा वाटतो. भारतातील मोठया वर्गास आयकराचा स्पर्शही झालेला नाही.भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक असंघटित क्षेत्र आहेत, ज्यांचा योग्य हिशोब केला जात नाही. श्रेणी 2, 3 शहरातील व्यवसाय मालक जे लाखो कमावत आहेत परंतु कर टाळण्यासाठी उत्पन्न दाखवत नाहीत. आयकर भरणारा वर्ग हा प्राामुख्याने नोकरदार वर्ग आहे, कारण त्याला ताय्च्चे उत्पन्न लपविण्याचा मार्ग उपलब्ध नाही. नोकरदाराचे वार्षिक उत्पन्न 20 लाख असेल असेल सहा लाख रुपये आयकर भरावा लागतो, त्याच्या हाती 14 लाखच येतात. वीज, दूध, वाहतूक, निकृष्ट दर्जाचे राहणीमान, मते मिळविण्यासाठी राजकारण्यांकडून विविध समाजगटांना दिल्या जाणा-या मोफत योजना, वाढता कराचा बोजा, वाढत्या खर्चामुळे मध्यमवर्ग अत्यंत संतप्त आणि अस्वस्थ आहे. अगदी सरकारी कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारीदेखील आयकराच्या कचाट्यात येतो.

कर चुकवेगिरी

व्यवसाय करणा-या लोकांना कर चुकविण्यास उाप्योगी ठरणा-या अनेक त्रुटी आयकर कायद्यात उपलब्ध आहेत. वार्षिक 30-40 लाखांपर्यंत उत्पन्न 2 कोटीपर्यंत उलाढाल असलेला छोटा व्यवसाय आयकर भरणे सहज टाळू शकतो. 2 कोटीची ही मर्यादा केवळ व्यवहारांसाठी बँकिंग चॅनेल वापरणाऱ्या कायदेशीर व्यवसायांसाठी आह. प्रामुख्याने रोख रकमेवर चालणाऱ्या इतर व्यवसायांना अशी मर्यादा नाही.

मोठे उद्योगपती प्रचंड नफा कामवूनही उद्योग तोट्यात चालला असे दाखवून पैशाची इतरत्र गूंतवणूक करतात. कॉर्पोरेट टॅक्स चुकवण्यासाठी कायद्यातील पुरेशा त्रुटी आहेत. कंपन्यांचा नफा आणि त्यानंतरचा कर कमी करण्यासाठीलेखा संस्था आकडेवारीचे खेळ करतात. आमच्या कर संहितेतील त्रुटी त्यांना ते करु देतात. गडगंज शेतकरीही शेतजमिनीच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न दाखवत नाहीत.

आयकर नसलेले वीस देश

जगात 20 देश असे आहेत की तेते आयकरच नाही . त्या देसंची नावे आहेत, अँटिग्वा आणि बार्बुडा, बहामास, बहारीन , ब्रुनेई, केमन बेटे, कुवेत, मोनॅको, उत्तर कोरिया, ओमान, पिटकेर्न बेटे, कतार, सेंट बार्थेलेमी, सेंट किट्स आणि नेव्हिस, सौदी अरेबिया, तुर्क आणि कैकोस बेटे, संयुक्त अरब अमिराती, वानू, व्हॅटिकन सिटी, वॉलिस आणि फ्युटुना,पश्चिम सहारा.



RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments