विधानसभेने केंद्राकडे एकमताने केली शिफारस
मुंबई – क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणारा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झाला
मागील अनेक वर्षापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात या वे अशी मागणी सातत्याने राज्यातील सर्वच स्तरातून करण्यात येत होती. तसेच राज्यातील महायुती सरकारनेही यासंदर्भात राज्यातील जनतेला आश्वासन दिले जात होते. अखेर विधानसभेत भाजपाचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भातील ठराव मांडला. त्यास सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या शिफारशीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला. हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.
या ठरावाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे लोकमान्यतेचे प्रतीक आहेत. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान या महान विभूतींना तो सन्मान मिळायला हवा.”
या ठरावामुळे सामाजिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणारा आहे. ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या माध्यमातून या विभूतींचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला.क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडण्यात आला.ठराव मांडताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात
येते. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले.त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येत आहे असे जाहिर केले.