Monday, October 7, 2024
Homeकलारंजनमहाराष्ट्रात दृश्य कला विद्यापीठ हवे

महाराष्ट्रात दृश्य कला विद्यापीठ हवे

महाराष्ट्रात कला विद्यापीठ स्थापन व्हावे ही मागणी कला क्षेत्रातील लोक अनेक वर्षांपासून करीत आहेत . या संदर्भात लिहित आहेत मुंबई येथील कला शिक्षक सुरेंद्र जगताप. 1

जी.डी आर्ट आणि बी.एफ.ए. हे दोन अभ्यासक्रम एकच असून महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या नावावर शिकवला जाऊ लागला.जो विद्यार्थी शासकीय महाविद्यालयात बी.ए. एफ. शिकत असेल तो पदवीधर व जो विद्यार्थी इतर महाविद्यालयात जी.डी . आर्ट शिकेल तो पदविका धारक असा भेदभाव सुरु झाला.

हा भेदभाव दूर करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे कला संचालक बाबुराव सडवेलकर सर यांनी शासनास कला संचालनालयाचे स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता.मात्र अद्यापही ती मागणी पूर्ण झालेली नाही.

महाराष्ट्राला दृश्य कलेचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.हा वारसा महाराष्ट्रातील अनेक पिढ्या जपत आलेल्या आहेत.महाराष्ट्रातील अकेडेमिक कलाशिक्षण खऱ्या अर्थानं ब्रिटीशांच्या काळात सूरू झाले..या आर्ट स्कूल मधून अनेक उत्तमोत्तम कलाकार बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.या आर्ट स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या योग्यतेनुसार वेगवेगळ्या वर्गात व वेगवेगळ्या वर्षात प्रवेश दिला जात असे.

बाबुराव सडवेलकर

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही महाराष्ट्रात याच पद्धतीने अभ्यासक्रम सुरू होता.1960 साली तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी कलाशिक्षणाच्या उत्कर्षासाठी कला संचालनालयाची निर्मिती केली. या कला संचालनालयामार्फत महाराष्ट्रातील कलाशिक्षण एकसंध झाले.यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम शिकता आला..
हा अभ्यासक्रम दहावीनंतर तीन व पाच वर्षांचा होता..या अभ्यासक्रमास डिप्लोमा (G.D.Art )असेच संबोधले जात आहे.
या अभ्यासक्रमात दहावीनंतर उपयोजित कला, रेखा व रंगकला ,शिल्पकला हे पाच वर्षांचे पदविका ( G.D. Art. ) व अंतर्गत सजावट, वस्रकला, मृत्तिका कला,धातूकला हे तीन वर्षांची पदविका (G.D.Art ) अंतर्भूत होते.

१९८० च्या दशकात कलेच्या उच्च शिक्षणासाठी या अभ्यासक्रमांना विद्यापाठाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केला गेला ..महाराष्ट्रातील फक्त शासकीय महाविद्यालयाना हा विद्यापीठाचा दर्जा दिला गेला.यामुळे  महाराष्ट्रात एकच अभ्यासक्रम दोन वेगवेगळ्या नावावर ( G.D. ART व BFA ) शिकवला जाऊ लागला..
जो विद्यार्थी शासकीय महाविद्यालयात शिकत असे तो पदवीधर व जो विद्यार्थी इतर महाविद्यालयात शिकेल तो पदविका धारक असा सवतासुभा सुरू झाला..

हा सवतासुभा दुर करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे कला संचालक मा. बाबुराव सडवेलकर सर यांनी शासनास कला संचालनालय यांचे स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता.जर हा विद्यापीठाचा प्रस्ताव मंजूर झाला असता तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान पदवी मिळाली असती..

मध्यंतरीच्या काळात पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विषयी अनेक नियम बदलले..एकंदरीतच महाराष्ट्रातील कला शिक्षणात पदवी व पदविका अशी दरी निर्माण केली गेली.नंतरच्या काळात तर डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षणासाठी व नोकरीसाठी डावलले गेले..उच्च शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना संधीच न मिळाल्याने  सर्वच बाबतीत कोंडी झाली.खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला अशी संधी मिळावी यासाठी सरकारने तीन वर्षांपूर्वी विद्यापीठा ची घोषणा केली.. कमिटी बनवली … प्रस्ताव बनवला.. नंतर पुन्हा माशी शिंकली .

विद्यापीठाची घोषणा ..   हवेतच विरली..

महाराष्ट्रातील कला शिक्षणाचा दर्जा हा देशभरात अव्वल असुनही पदवी व पदविका या दोन अभ्यासक्रमांचा सवतासुभा हा सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अन्याय कारक आहे..गेली अनेक वर्षे या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे पंख छाटले गेले.. मानसिक खच्चीकरण केले गेले..

खरंतर महाराष्ट्रातील कला शिक्षण देशपातळीवर अव्वल आहे.. जर सर्वांना समान संधी मिळाली तर विद्यार्थ्यांना नवे क्षितीज  मिळेल.कर्नाटक राज्याने काही वर्षांपूर्वी त्या राज्यातील पदविका अभ्यासक्रम बंद करून त्याऐवजी  त्यांना हंपी विद्यापीठाची पदवी संलग्नता दिली..

मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याने ही हेच धोरण अवलंबिले..आपल्याकडे राज्य विद्यापीठाची मागणी असताना हे कला मंडळ स्थापन करण्याचा घाट का घातला गेला हे अनाकलनीय आहे..एकंदरीतच महाराष्ट्र सरकार कला शिक्षणाचे अवमूल्यन करू पाहत आहे का???न्व8न शैक्षणिक धोरणानुसार कला शिक्षण हे अनिवार्य करण्यात आले आहे.. शिक्षणाचे नवनवीन प्रयोग होऊ पाहत आहे.. यात महाराष्ट्र अग्रेसर रहावा या साठी सरकारने ईच्छा शक्ती दाखवण्याची गरज आहे..सरकारने  दृश्य कला विद्यापीठाची स्थापना करुन सर्व कलाशिक्षण एकाच छताखाली उपलब्ध करून द्यावे.. जेणे करून महाराष्ट्राच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल..आणि या साठी सरकारवर फारसा भारही येणार नाही..

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, शिक्षक, व संस्था या नवीन विद्यापीठाचे स्वप्न पहात आहेत..

  1. ↩︎
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments