Saturday, December 21, 2024
Homeरोजगारमुंबईत 300 पदांच्या भरतीसाठी हजारो तरुण

मुंबईत 300 पदांच्या भरतीसाठी हजारो तरुण

अनियंत्रित जमावामुळे एअर इंडियाने भरतीची तारीख पुढे ढकलली

मुंबईत 17 जुलै 2024 रोजी एअर इंडियामध्ये केवळ 300 पदांची भरती होती, मात्र हजारो उमेदवारांनी ही नोकरी मिळविण्यासाठी धाव घेतली , त्यामुळे बेरोजगारांचा प्रचंड मोठा जमाव कलिना परिसरात जमा झाला. यातून काही चेंगराचेंगरीची घटना घडू नये यासाठी पोलिसांना पाचारण कराावे लागले. मागील आठवड्यात गुजरातमध्ये अंकलेश्वर आनि भडोच येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.नोकरीच्या आशेने जामणारे हे बेरोजगारांचे जमाव काय सांगत आहेत?

सध्या एअर इंडियाकडून एअरपोर्ट लोडर्स या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी कलिना येथील एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लि. मध्ये थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आलेे होते. या कंपनीत 300 पदांची भरती करण्यासाठी 17 जुंलै 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेसाठी 30 हजारापेक्षा अधिक बेरोजगारांनी गर्दी केली. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

विमानात सामान चढविणे आणि उतरवणे, बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवणे ही कामे या पदावरील व्यक्तीला करावी लागतात. या पदावर काम करणा-या व्यक्तीला 20 ते 25 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळतो. लोडर हे खरेतर हृमाल या पदासारखेच पद आहे. मात्र नोक-याच मिळत नसल्याने उच्चसिक्षित तरुणांनीही या नोकरीसाठी गर्दी केलेली दिसली. केवळ महाराष्ठ्रच नाही तर अनेक राज्यातून तरुण नोकरीच्या असेने आले होते.

नोकरीसाठी तरुणांची ही गर्दी हाताळतांना विमानतळ प्रशासनाच्या नाकी नऊ आले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अर्जदारांना त्यांचे अर्ज जमा करून परिसर सोडण्यास सांगण्यात आले. आता या पदासाठी परीक्षा अथवा मुलाखती कधी होणार याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Looks safe

अशीच घटना मागील आठवड्यात गुजरात राज्यातील भरुच जिल्हयातील अंकलेश्वर येथे थरमॅक्स या खाजगी रासानिक कंपनीत केवळ 10 जागा भरावयाच्या होत्या. त्यासाठी प्लाझा हॉटेलमध्ये मुलाखतींचे आयोजन केलेले होते. या कंपनीत 11 जुलै 2024 रोजी भर्ती करायची होती. यावेळी शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा मोठा जमाव जमला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि गुजराती मीडियावर व्हायरल झाला आहे. या खुल्या मुलाखतीदरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने तरुण आले होते की, रेलिंगही तुटून अनेक विद्यार्थी खाली पडले.

जगात बेरोजगारीत भारत पाचवा

सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार भारतात बेरोजगारीचा दर या वर्षातील सर्वाधिक 9.2 टक्के आहे. याच संस्थेेने जाहीर केले आहे की, द्क्षिण आफ्रिका, स्पेन , तुर्कस्तान, ब्राझिल या चार देशानंतर भारताचा बेरोजगारीत पाचवा क्रमांक आहे.

पोलिस भरतीसाठी अठरा लाख अर्ज

महाराष्ट्रात गृह खात्यातर्फे पोलिस भरती करण्यात येत आहे. 2024 मधील या भरतीसाठी 17 हजार 641 जागांसाठी 17 लाख 46 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. उत्तर प्रदेशमध्ये गतवर्षी पोलिसांच्या

रेल्वे भरतीसाठी 47 लाख 45 हजार अर्ज

रेल्वेत 2024 मध्ये भरल्या जाणा-या 18 हजार 799 जागांसाठी विक्रमी 47 लाख 45 हजार अर्ज आले आहेत. याव्रुन बेरोजगारीचे वास्तव लक्षात येते. असिस्टंट लोको पायलट पदासाठी ही जाहिरात आहे . या पदासाठी साधारणतः 20 हजार रुाप्ये प्रतिमहिना पगार मिळतो. या पदासाठीही अनेक उच्चसिक्षितांनी अज्‍॒ केलेले आहेत.

नैराश्याने ग्राासलेली तरुण पिढी

कोणत्याही खात्यात जागा निघाल्या तरी परीस्थिती अशीचआहे. बेरोजगारीमुळे तरुण वय उलटून जात असले तरी लग्नही करु शकत नाहीत. दिवसेंदिवस समस्या बळकट होत चालल्या आहेत. तरुण पिढी निरासेने ग्राासली जात आहे. इतर समाजास आरक्षण आहे, आपणास नाही ही भावना प्रगत जातीय समूहातही बळावत आहे. राजकीय पक्ष यावर उपाययोजना करण्यापेक्षा , दुफळीचे तात्कालिक लाभ घेण्यात दंग आहेत. त्यामुळे जातीय भावना अधिक कट्टर होत असल्याचे शहरीआणि ग्राामीण भारतात दिसतआहे. समाजातील या बदलत्या जातीय ध्रुवीकरणामुळे यापुढच्या काळात समाजिक कलह मोठ्या प्रमाणात वाढतील अशी परिस्थिती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments