Saturday, December 21, 2024
Homeबातम्यासंविधान समता दिंडीचा एक जुलै रोजी प्रारंभ

संविधान समता दिंडीचा एक जुलै रोजी प्रारंभ

पुणे येथून फुलेवाड्यापासून तुकोबाराय पालखीसोबत निघणार

पुणे – पुणे येथील फुलेवाडा येथून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत दिनांक 1 जुलै ते 16 जुलै 2024 दरम्यान संविधान समता दिंडीचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे . या समता दिंडीत प्रत्येकाने किमान एक दिवसतरी सहभागी व्हावे असे आवाहन ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. केले आहे .

मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, परिवर्तनवादी संस्था, संघटनांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, संपादक, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते पंढरपूरच्या वारीत ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असे म्हणत वारीत एक दिवस चालतात.

एक तरी वारी अनुभवावी

पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.दा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात ७ जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत.

वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ यात सहभागी होणारी मंडळी दिवसभर चालून समजून घेतात. या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात.

वारीत सहभागी होण्याची ठिकाणे

  • 1 जुलै2024 – फुलेवाडा , पुणे
  • 2 जुलै2024 – लोणी काळभोर
  • 3 जुलै2024 – यवत
  • 4 जुलै2024 -वरवंड
  • 5 जुलै2024 -गवळ्याची उंडवडी
  • 6 जुलै2024 – बारामती
  • 7 जुलै2024 -सणसर
  • 8 जुलै2024 – अंधुर्णे
  • 9 जुलै2024 – निमगाव केतकी
  • 10 जुलै2024 – इंदापूर
  • 11 जुलै2024 – सराटी
  • 12 जुलै2024 – अकलूज
  • 12 जुलै2024 – बोरगाव
  • 14 जुलै2024 – पिराची कुरोली
  • 15 जुलै2024 – वाखरी
  • 16 जुलै2024 – पंढरपूर

संविधानप्रेमी आणि परिवर्तनवादी समविचारी नागरिकांनी शक्य तिथे या दिंडीत सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत संविधानाच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावं, असे आवाहन ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले.

अधिक माहितीसाठी ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर – 9892673047, शरद कदम- 9224576702, विशाल विमल – 7276559318, दत्ता पाकीरे – 8888185085 यंच्याशी संपर्क साधावा असे आवाहन्‍ करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments