Thursday, December 26, 2024
Homeशिक्षणबातम्यासामान्यांच्या विकासासाठी काम करा - राक्षसे

सामान्यांच्या विकासासाठी काम करा – राक्षसे

सामाजिक शास्त्रे संकुलातील राज्यस्तरीय कार्यशाळेत आवाहन

सोलापूर, दि. 27- प्रत्येक भारतीयाने विकसित भारतासाठी काम केले पाहिजे, योगदान दिले पाहिजे. हे योगदान देताना तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा विचार होणे आवश्यक आहे. त्याला उपदेश करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या विकासासाठी आपण काय करतो, हे महत्वाचे आहे असे मत टाटा सामजिक शास्त्र आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बाळ राक्षसे यांनी व्य्क्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलात पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियाना अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये समाजाचा सहभाग आणि कौशल्य व रोजगाराचा दृष्टीकोन या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. महानवर बोलत होते. यावेळी मंचावर तुळजापूर येथील टाटा सामजिक शास्त्र आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बाळ राक्षसे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. ज्ञानेश्वरी हजारे, डॉ. श्रीनिवास भंडारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलगुरु महानवर म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रीत व कौशल्यपूरक शिक्षणाचा विचार केला आहे. समाजाला उपयोगी पडणाऱ्या संशोधनाची आज गरज आहे. त्यामुळे समाजोपयोगी तसेच कौशल्य विकासावर आधारित संशोधनावर अध्यापक व संशोधकांनी भर द्यावा. आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून संशोधन आणि शिक्षण होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार आहे. या कार्यशाळेत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलटिक्स आणि इकॉनामिक्सचे डॉ. प्रकाश व्हनकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी ही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी डॉ.ए. के. भासके, व्ही. के. खडाखडे, एस.एस. नश्ते, डॉ. टी. आर. कांबळे, डॉ. एच. ए. शेख,, डॉ. एम. डी. जक्कन, डॉ. एस. आर. पाटील, एस.जी. राठोड, डॉ. एस. पी. शिंदे, एच. एस. शिंगे, आर.बी. म्हामणे, आर.व्ही. मंडलिक, डॉ.एस.पी. काळे, ए.आर. पांढरे, श्री व्ही.बी. एडाके, श्री.आर.जी. भोसले, डॉ. व्ही. एच. भोसले आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments