मुंबई – भ्रष्टाचार आणि लाच दिल्याच्या आरोपामुळे सध्या सर्व बाजूने अदानी उद्योग समूह अडचणीत आला आहे. एक है तो सेफ है या आशेवर आता ट्रंम्प कार्डच अदानींना तारु शकते.
भ्रष्टाचार आणि लाच दिल्याच्या आरोपामुळे अदानी उद्योग समूह जगभरात्त चर्चेचा विषय बनला आहे. देश – विदेशातून अदानी यांना नकार मिळत आहे. फिच या आंतरराष्ट्रीय संस्थेने अदानींच्या चार कंपन्यांचे रेटिंग घटविले आहे.अनेक गुंतवणूकदारांनी यापुढे अदानी कंपनीत गुंतवणूक करणार नाही अशा प्रकारच्या घोषणा केल्या आहेत . सेबी मार्फतही अदानी उद्योग समूहावरील आरोपांची चौकशी सुरु झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हाती सत्ता घेतील तेव्हाच अदानींचे ग्रह बदलतील एवढीच आशा शिल्लक आहे.
- ‘फिच ‘ने अदानीच्या चार कंपन्यांचे रेटिंग घटविले.
- फ्रान्सच्या टोटलएनर्जीज कंपनीने जाहीर केले यापुढे अदानीच्या कंपनीत नवीन गुंतवणूक करणार नाही.
- केनिया सरकारने गौतम अदानी यांच्याकडून विमानतळ उभारणी आणि उर्जा प्रकल्प उभारणीचे कंत्राट रद्द केले आहे.
- तेलंगणा सरकारने अदानी यांनी देऊ केलेली कौशल्य विद्यापीठासाठीची शंभर कोटीची देणगी नाकारलीआहे.
- सेबी मार्फत अदानींच्या संदर्भातील आरोपाची चौकशी पूर्णत्वास.
- श्रीलंकन सरकारने विमानतळ उभारणीसाठी अदानींना यांना कोणतेही रक्कम दिलेली नाही.
- ट्रंप यांनी अमेरिकेच्या अद्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर अदानींचे सर्व प्रश्न सुटण्याची शक्यता.
फिच रेटिंग या आंतरराष्ट्रीय कंपनीने अदानी यांच्या चार कंपन्यांचे रेटिंग घटवले असून ते निगेटिव्ह केले आहे, तर तीन कंपन्यांची रेटिंग वॉच निगेटिव्ह मध्ये ठेवले आहे .यामुळे अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा आठ टक्क्याने कोसळले आहेत.अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन या दोन कंपन्यांचे शेअरचे दर मागील एक आठवड्यात अनुक्रमे 37% आणि 32 टक्के कोसळल्या आहेत
फ्रान्स मधील टोटल एनर्जी या कंपनीने जाहीर केले आहे की या पुढच्या काळामध्ये अदानीच्या कंपन्यांमध्ये कुठलीही वाढीव गुंतवणूक केली जाणार नाही. टोटलएनर्जी ही एक आंतरराष्ट्रीय कंपन्या असून ती ऊर्जा आणि पेट्रोलियमच्या क्षेत्रामध्ये कार्य करते.
केनिया देशाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी जाहीर केले आहे की अदानी उद्योग समूहा सोबत केलेले सर्व प्रकल्पाचे करार आम्ही रद्द करत आहोत. यामध्ये विमानतळ उभारणे , उर्जा प्रकल्प इत्यादीचा समावेश होता.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जाहीर केले आहे की अदानी यांच्या उद्योग समूहाच्या संदर्भात सध्या सुरू असलेले वादविवाद लक्षात घेता या उद्योग समूहाणे तेलंगणामध्ये कौशल्य विद्यापीठ उभारण्यासाठी जाहीर केलेला शंभर कोटी रुपयांचा निधीआमी नाकारत आहोत .कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा निधी स्वीकारणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे
गौतम अदानी यांचा श्रीलंकेतील नियोजित उर्जा प्रकल्प अधांतरी लटकताना दिसत आहे. 3700 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. श्रीलंकेच्या प्रशासनाने या प्रकल्पाच्या संदर्भाने पुनर्विचार करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात निर्णय घेतला जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे
भारतातील भांडवली बाजारातील नियंत्रण करणाऱ्या सेबी संस्थेने अदानी उद्योग समूहावरील आरोपांची चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेने अदानी यांच्यावर लावलेल्या लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत तसेच हिंडेनबर्ग सच्॒ रिपोर्टच्या संदर्भाने ही चौकशी केली जाणार आहे.
दुस-या बाजूला अदानी समूहाने दावा केला आहे की, आमच्या कंपन्यांवर केल्या गेलेल्या आरोपात तथ्य नाही. जरी बाहेरच्या देशातील गुंतवणूकदारांनी गूंतवणूक केली नाही तरी स्वबळावर अदानी उद्योग समूह उभारी घेऊ शकेल. आमच्याकडे पुरेसा निधी असून सर्व कर्ज परत करणे आणि उद्योगाचा कारभार नीटपणाने सुरु ठेवणे आम्हाला शक्य आहे. पुढील 28 महिने पुरेल इतका निधी आमच्याकडे आहे. यातून कर्जाची परतगेड करणे शक्य होणार आहे.
सर्व बाजूने घेरल्या गेलेल्या अदानी उद्योग समूहाला आता एकच गोष्ट तारू शकते, ती म्हणजे ट्रम्प कार्ड. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तो कार्यभार स्वीकारल्यानंतर अदानी यांच्यावरचे भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप मागे घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.