Monday, October 7, 2024
Homeबातम्यासीएसआयआर - यूजीसीची नेट परीक्षा लांबणीवर

सीएसआयआर – यूजीसीची नेट परीक्षा लांबणीवर

एनटीए मार्फत होणा-या परीक्षांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला

नवी दिल्ली – देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांची वाट लावण्याचे सरकारचे धोरण आहे की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे . वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची NEET परीक्षा नीट झाली नाही, UGC -NET परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी रद्द केली . आता 25 जून 2024 रोजी होणारी CSIR – UGC ची नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे . या सर्व परीक्षांचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . या यंत्रणेवरचा विदयार्थ्यांचा विश्वास उडाला आहे.

या प्रकारांमुळे  अस्वस्थ तरुण पिढीला रस्त्यावर  आंदोलनात उतरायला सरकार भाग पाडत आहे .विवेकानंद म्हणत असत “तुमच्या देशातील तरुणाईची ओठावर कोणती ठिकाणी आहेत ते सांगा मी तुमच्या देशाचे भविष्य सांगतो  “ . सध्या आंदोलन करणाऱ्या तरुण पिढीच्या ओठावर जी गाणी आहेत ती ऐकल्यास देशाच्या भवितव्याची चिंता वाटते .

2018 मध्ये NTA स्थापन

मुळात त्या – त्या राज्यात शिक्षणाच्या पुरेशा सुविधा असायला हव्या . स्वातंत्र्यानतर 77 वर्ष होऊनही प्रत्येक राज्यात शिक्षणाच्या पुरेशा सुविधा निर्माण झालेल्या नसतील  तर सत्ता कोणत्याही पक्षाची असो , हे सरकारचे अपयश आहे . वास्तविक विविध अभ्यासक्रम प्रवेशासाठीची प्रकीया फार तर राज्य स्तरावर व्हायला हवी . मात्र राज्य सरकारांवर अविश्वास दाखवून अनेक अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेशाचा घाट घातला गेला .2018 साली केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने NTAची स्थापना करून, त्या यंत्रणेवर या परीक्षांची जबाबदारी सोपविली . जेईई, नीट, यूजीसी-नेट, जीपॅट, सीमॅट, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची प्रवेश परीक्षा, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा, ‘आयसीएआर’ची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा, ‘आयआयएफटी’ची प्रवेश परीक्षा, ‘इग्नू’ची पीएचडी आणि ओपनमॅट परीक्षा, दिल्ली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा आदी 12 विविध प्रकारच्या परीक्षा ‘एनटीए’ घेते. त्यातून देशभरातील शिक्षण माफियांना पैसे कमावण्याची संधी मिळावी . NEET परीक्षेचा एक-एक पेपर 33 लाखाला विकत विकल्याची कबुली आरोपी देतात . ग्रेस गुणांचा बाजार मांडला जातो . 

NEET  चे पावित्र्य भंगले

NEET  परीक्षेच्या पावित्र्याच्या चिंधड्या उडाल्या आहेत असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालय नोंदविते .तरीही या परीक्षेनंतरची प्रवेश प्रक्रीचा थांबविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालय देत नाही , हे सारे अनाकलनीय आहे . ज्यांनी जिवापाड मेहनत करून अभ्यास केला ते विद्यार्थी अस्वस्थ आहेत . नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक राज्यात विद्यार्थी आंदोलने करीत आहेत .

 CSIR -UGC ची 25 जून ची नेट परीक्षा लांबणीवर

 CSIR -UGC ची 25 जून 2024 रोजी होणारी नेट परीक्षाहा पुढे ढकलण्यात आली आहे . लाईफ सायन्सेस, अर्थ सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसाठी ही  नेट परीक्षा होते . या दोन लाखाहून अधिक परीक्षार्थी ही परीक्षा देणार होते NTA ने यापूर्वीच 18 जून 2024 रोजी झालेली UGC -NET परीक्षा रद्द केलेली आहे . 18 जूनच्या नेट परीक्षेला 11 लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती . टेलिग्राम च्या काही ग्रुपवर परीक्षेच्या दोन दिवस आधी नेट परीक्षेचे पेपर प्रत्येकी 5 ते 10 हजार रुपयास विकले गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे .

विद्यार्थ्यांचा नाहक खर्च

नेट परीक्षा केवळ काही मोठया शहरात होते . खेड्यापाड्यातील विद्यार्थी मोठा खर्च करून नेट परीक्षा देण्यासाठी मोठ्या शहरात आले होते . त्या सर्वांची निराशा झाली, विनाकारण खर्चाचा बोजाही पडला . तसेच आता पुढची नेट परीक्षा कधी होईल त्याचाही भरोसा नाही .  ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळण्यासाठी, सहायक प्राध्यापक होण्यास पात्र ठरण्यासाठी आणि आता नवीन आदेशानुसार कोणत्याही विद्यापीठात पीएचडी श्रभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा देणे अनिवार्य आहे .

विश्वास उडाला

NTA च्या विविध परीक्षांमध्ये गोंधळामुळे देशभरातील 46 केंद्रीय विद्यापीठ होणारी प्रवेश प्रक्रिया देखील लांबणीवर पडणार आहे .केंद्रीय विद्यापीठातील प्रवेशासाठी 15 ते 31 मे 2024 दरम्यान प्रवेश परीक्षा पार पडली होती .या परीक्षांचे निकाल 30 जून पर्यंत लागणे अपेक्षित होते .मात्र सध्याच्या परिस्थितीत हे निकाल 30 जून पर्यंत लागणे अशक्य आहे त्यामुळे एक ऑगस्ट पासून केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश सत्र सुरू होणार होते ते आता किमान 15 ते 20 दिवस लांबणीवर पडेल अशी शक्यता आहे .

NTA वरचा आमचा विश्वास उडाला ाशून, पुढची परीक्षाही नीट पार पडेल याची खात्री काय असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. NTA ही यंत्रणाच बरखास्त करावी अशी विदयार्थ्यांची मागणी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments