Thursday, October 3, 2024
Homeबातम्यासोलापूर विज्ञान केंद्रात मल्टीमीडिया प्रदर्शन

सोलापूर विज्ञान केंद्रात मल्टीमीडिया प्रदर्शन

पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त कार्यक्रम

सोलापूर – पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या सयुंक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुउदेशीय सभागृहामध्ये आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाचे 23 ऑगस्ट 2024 रोजी उदघाटन झाले .

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . प्रकाश महानवर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले .यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहसंचालक नलिनी टेंभेकर, उपायुक्त तैमूर मुलाणी, आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, विज्ञान केंद्राचे राहुल दास एम, नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे सदस्य सचिव बिनय प्रसाद साव आणि सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा प्रवास हा बैलगाडी, सायकल पासून सुरू झाला आणि 23 ऑगस्ट2023 रोजी भारताने चंद्रयान-3 तीन मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि प्रज्ञान रोव्हरने पृथ्वीवर छायाचित्र पाठवले, हा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि अंतराळ संशोधक व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी यावेळी केले.

सोलापूर विज्ञान केंद्रात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची आणि इस्रोच्या स्थापनेपासून ते चांद्रयान-3 मोहिमे पर्यंतच्या प्रवासाची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून राहुल दास यांनी दिली.

चांद्रयान-3 मोहीम, आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा, मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने स्वीकारण्यात आला. विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, त्याला ‘शिवशक्ती’ पॉइंट (सतीओ शिव शक्ती) म्हणून ओळखले जाते, हा आपल्या सर्वासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लैंडिंग करणारे भारत चौथे राष्ट्र बनल्यानंतर आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. या घटनेच्या स्मरणार्थ, 23 ऑगस्ट हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या वर्षी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस ‘चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे: भारताची अंतराळ गाथा’ या संकल्पनासह अभिमानाने साजरा केला जात असल्याचे अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये 25 शाळेतील विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनावर विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये चांद्रयान-3 मोहिमेचे मॉडेल, जलविद्युतनिर्मितीचे प्रकल्प, रॉकेट सायन्स, आर्यभट्ट  उपगृह यासारख्या अनेक विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.

सदर प्रदर्शनामध्ये चांद्रयान-3 मोहिमेची निर्मिती, प्रक्षेपण, चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो, मा. पंतप्रधान यांचे भाषण, संपूर्ण मोहिमेचे ऑडीओ व व्हिडीओ आणि सेल्फी विथ चांद्रयान -3 मोहीम इत्यादी माहिती असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 11ते 5.30 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, विज्ञान केंद्राचे श्रीकांत बिदरे, ज्योती दास, व्यंकट देशमुख, औदुंबर गायकवाड, बाळासाहेब राठोड, भाग्यश्री मंडवळकर, सोनाली भोसले, राजेंद्र चिटटे, विठ्ठल गायकवाड, अर्चना भोसले, साईराज राऊळ, सुरज जाधव आदींनी परिश्रम घेतले.   

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments