नवी दिल्ली – दुबईहून दीडशे व-हाडी घेऊन लग्नासाठी दीपक कुमार नवरदेव पंजाबमधील मोगा येथे पोहोचला. तेथे गेल्यावर त्याचे ज्या मनप्रीत कौरशी लग्न ठरले तीही तेथे नाही आणि ज्या रोज गार्डन मंगल कार्यालयात त्यांचे ल्ग्न होणार होते, त्या नावाचे मंगल कार्यालयही तेथे नाही. ‘अपनी ही शादी मे दीपक दीवाना ‘ अशी त्याची स्थिती झाली.
प्रेम आंधळे असते याचा ानुभव यात पुन्हा आला. काही लोक खरोखरच प्रेमात इतके पुढे जातात की ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात तेच दीपक कुमारबाबत घडले.
दीपक कुमार नकोदर तालुक्यातील मडियाला महतपूर गावातील रहिवासी आहे आणि दुबईमध्ये काम करतो. मनप्रीत कौरशी मी सोशल मीडियावर त्याची मैद्री झाली.सुमारे तीन वर्षे प्रेम असूनही मुलीने कधीही मुलाला आपला चेहरा दाखवला नाही. जेव्हा जेव्हा मुलाने तिला तिचा चेहरा दाखवण्यास सांगितले, तेव्हा ती मुलगी म्हणाली की ती फक्त लग्नावेळी मुंहदिखाई मिळाल्यावरच तिचा चेहरा दाखवेल.त्या दोघांनी एकमेकांना न भेटता लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हा विवाह सोहळा शुक्रवारी मोगा येथील रोझ गार्डन पॅलेसमध्ये होणार होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वर दीपक त्याच्या संपूर्ण व-हाडींसह मोगाला पोहोचला. येथे पोहोचल्यावर त्याला कळले की जेथे लग्न होणार होते , ते रोज गार्डन नावाचे मंगल कार्यलयच अस्तित्वात नाही. . जेव्हा दीपकने मुलीला फोन केला, तेव्हा तिने उत्तर दिले की तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला घ्यायला येत आहोत आणि मग फोन कट केला. नवरदेवाने अनेक तास वाट पाहिली, मात्र नवरी अथवा तिच्या घरचे आलेच नाहीत. अखेर दीपक आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
आमची फसवणूक झाली आहेः दीपकचे वडील प्रेमचंद म्हणाले, “आम्ही मुलीच्या कुटुंबाशी कधीही वैयक्तिकरित्या बोललो नाही, परंतु मुलीनेच आम्हाला लग्नाबद्दल सांगितले. यापूर्वी 2 डिसेंबर रोजी लग्न होणार होते, परंतु मुलीने सांगितले की तिच्या वडिलांची प्रकृती ठीक नाही, म्हणून 6 डिसेंबर रोजी लग्न होणार आहे. आमची फसवणूक झाली आहे. दिवसभर आम्ही त्या मुलीची वाट पाहत होतो. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही खूप खर्च आणि कर्जे केली आहेत.
पोलीस अधिकारी हरजिंदर सिंग यांनी सांगितले की, आम्हाला वर आणि त्याच्या कुटुंबाकडून तक्रार प्राप्त झाली आहे. सध्या आमच्याकडे फक्त मुलीचा फोन नंबर आहे. आम्ही त्याचा शोध घेऊ आणि यामागे कोण आहे ते पाहू. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल.