विकासकामास असलेली बंदीही उठविण्यात आली
अयोध्या – अयोध्या शहरापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असलेली सैन्यासाठी राखीव असलेली 13 हजार 351 एकर जमीन गौतम अडाणी ,बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकर यांच्यासी निगडित संस्थांच्या मालकीची झाली आहे . त्यांना ही जमीन विकसित करण्यास परवानगीही देण्यात आली आहे
अयोध्येतील जमिनीचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत, या पार्श्वभूमीवर ठराविकच व्यक्तींशी निगडित संस्थांना ही जमीन विकली जाणे आणि या जमिनीवरील विकासकामाला असलेली बंदी काढून टाकून , त्यांना ही जमीन विकसित करण्याचा परवाना दिला गेला. या घटनेत शासकीय यंत्रणेने परवानगी देण्यासाठी दाखविलेली कमालीची तत्परता सर्वसामान्यांना चक्रावणारी आहे.”लष्कर प्रशिक्षणासाठी बफर झोन म्हणून अधिसूचित केलेली जमीन आधी अदानी, रविशंकर आणि बाबा रामदेव यांच्याशी निगडित संस्थांनी विकत घेतली आणि नंतर राज्यपालांद्वारे डिनोटिफाय केली गेली. आता या जमिनीवर विकासकामालाही परवानगी देण्यात आली आहे.
रामलल्ला मंदिराच्या पायाभरणीपूर्वीच राज्यातील अनेक व्हीआयपी व्यक्ती आणि उद्योग आणि अध्यात्मातील बड्या व्यक्तींनी अयोध्येच्या आसपास मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशिवाय यामध्ये योगगुरू बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि अदानी समूहाची सहयोगी कंपनी यांच्या जवळच्या लोकांचाही समावेश आहे. या तिघांनी ज्या ठिकाणी जमीन खरेदी केली आहे ती जागा लष्कराचा बफर झोन म्हणून अधिसूचित करण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या या घोडे-व्यापारानंतर, राज्यपालांनी आता या भागांना डीनोटिफाय केले आहे.
आयोध्या शहरापासून जवळच माझा जमतारा हे गाव आहे . अयोध्येत सैन्यदलाचे कॅटोनमेंट असून डोगरा रेजिमेंट केंद्र आणि पायदळ बिग्रेड आहे . सैन्यदलाच्या फायरिंग रेंज साठी माझा जमतारा परिसरातील चौदा गावांची 13 हजार 351 ही जमीन विकसित करण्याची परवानगी अयोध्या विकास प्राधिकरणाने दिली. विशेष म्हणजे ही जमीन गौतम अडाणी, बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकर यांच्याशी निगडित संस्थांच्या वतीने विकत घेण्यात आलेली आहे .
उच्च न्यायालयाचा मनाई हुकूम
अयोध्येतील वकील प्रवीण कुमार दुबे यांनी अधिसूचित जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 24 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशात न्यायालयाने अयोध्या विकास प्राधिकरणाला (ADA) जमिनीच्या मालकीची योग्य पडताळणी केल्याशिवाय योजना मंजूर करण्याविरुद्ध निर्देश दिले. त्यात म्हटले आहे की, “संरक्षण मंत्रालयाकडे सोपवलेल्या राज्य जमिनीवर कायद्याचे उल्लंघन करून अतिक्रमण किंवा नष्ट करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.”
विकसनाची परवानगी
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या काही महिने आधीच अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या होमकेस्ट इन्फ्रा स्पेसने भाजपच्या माजी आमदार आणि स्थापन केलेल्या संस्थेकडून खरेदी केली . श्रीश्रीरविशंकर यांच्या आश्रयाने नोंदणीकृत असलेल्या व्यक्ती विकास केंद्र या ट्रस्टने ही याच भागात जमीन खरेदी केली .जुलै 23 मध्ये हरियाणा योग आयोगाचे अध्यक्ष जयदीप आर्य जे बाबा रामदेव यांच्या भारत स्वाभिमान ट्रस्ट संबंधित आहेत त्यांनी काहीसहकाऱ्यांसह जात परिसरात जमीन खरेदी केली . ॲड . प्रवीण दुबे म्हणाले सैन्यासाठी राखीव असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले म्हणून या खरेदीच्या विरोधामध्ये खटला अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे . असेअसताना मे 2024 मध्ये अचानकच ही जमीन विकसित करण्यासाठी परवानगी देण्याचा अयोध्या विकास प्राधिकरणाचा निर्णय कसा घेऊ शकते असा प्रश्न अॅड . दुबे यांनी उपस्थित केला आहे .