प्रतिस्पर्धी उत्पादनावरची धार्मिक टीका भोवली
नवी दिल्ली – पतंजलीच्य गुलाबपाणी सरबताचे गुणगाण करताना रामदेवबाबा यांनी हमदर्द च्या रूह आफजा सरबताचा उल्लेख ‘ जिहादी सरबत’ केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने रामदेवबाबा यांना चांगलेच फटकारले आहे .आपल्या उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने जाहिरात केल्याबद्दल यापूर्वीही रामदेव बाबांना न्यायालयांमध्ये अनेकदा माफी मागावी लागलेली आहे .
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, बाबा रामदेव यांनी ‘रूह अफजा’ वर केलेली ‘शरबत जिहाद’ ची कथित टिप्पणी’ विवेकाला धक्का देणारी आहे’ आणि हे अक्षम्य आहे, यावर बाबा रामदेव यांनी संबंधित ऑनलाइन मजकूर त्वरित काढून टाकण्याचे आश्वासन दिले .
.न्यायाधीश अमित बन्सल रामदेव यांच्या पतंजली फूड्स लिमिटेडच्या विरोधात हमदर्द नॅशनल फाऊंडेशन इंडियाच्या याचिकेवर सुनावणी करत होते ते म्हणाले, हे बोलणे अक्षम्य आहे .. रामदेवबाबांच्या वकिलांना न्यायाधीश म्हणाले तुम्ही रामदेवबांना सूचना घ्या, अन्यथा आम्ही कठोर आदेश देऊ .
.न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर, रामदेव बाबांच्या वकिलांनी सांगितले की, वादग्रस्त वक्तव्यांवरील सोशल मीडिया पोस्ट वगळता सर्व जाहिराती-मुद्रित किंवा व्हिडिओ-त्वरित काढून टाकल्या जातील.न्यायालयाने रामदेव यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि म्हटले की, जेव्हा मी हे (व्हिडिओ) पाहिले तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता.आदेशात पुढे म्हटले आहे की, “प्रतिवादी क्रमांक 2 (रामदेव बाबा) यांनी प्रतिज्ञापत्र देखील नोंदवले पाहिजे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ते भविष्यात प्रतिस्पर्ध्यांच्या उत्पादनांशी संबंधित अशी कोणतीही विधाने, जाहिराती किंवा ट्विट किंवा सोशल मीडिया पोस्ट जारी करणार नाहीत”.
अलीकडेच पतंजलीच्या ‘गुलाब शरबत’ चा प्रचार करताना रामदेव यांनी दावा केला होता की, ‘हमदर्द’ च्या ‘रूह अफजा’ मधून मिळणारा पैसा मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरला जातो.रामदेवबाबा यांनी कोणत्याही ब्रँड किंवा समुदायाचे नाव मी घेतलेले नाही, असे म्हणत आपल्या वक्तव्याचा बचाव केला.
हे प्रकरण तिरस्काराच्या पलीकडे गेले असल्याचा युक्तिवाद करताना रोहतगी म्हणाले की, यामुळे ‘जातीय फूट’ निर्माण होत आहे.”हे द्वेषयुक्त भाषण आहे. रामदेवबाबा म्हणतात हा एक शरबत जिहाद आहे. त्यांनी त्याचा व्यवसाय चालू ठेवला पाहिजे. ते हमदर्द कंपनीला का त्रास देत आहे? ते म्हणाले.रामदेव बाबांनी कंपनीच्या संस्थापकांच्या धर्माला लक्ष्य करू नये, असे मत ज्येष्ठ वकील संदीप सेठी यांनी यावेळी व्यक्त केले.
.रोहतगी म्हणाले की, अॅलोपॅथीला लक्ष्य केल्याबद्दल रामदेव यांना यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागले होते आणि “हे लवकर संपवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे”.रामदेव यांना त्यांची राजकीय मते व्यक्त करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यांच्या उत्पादनांचा अवमान करण्याच्या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल, असे नायर म्हणाले.
रामदेव आणि पतंजली कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते.”जर त्याने मत दिले तर त्याला रोखले जाऊ शकत नाही. एखाद्याला मत व्यक्त करण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही “, नायर म्हणाले.