सोनम वांगचूक यांची चलो दिल्ली पदयात्रा
लेह – ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ सोनम वांगचूक यांनी लडाख प्रांताच्या चार मागण्यांसाठी हजारो कार्यकार्यांसह लेह ते नवी दिल्ली अशी 1000 किलोमीटर अंतराची पदयात्रा 1 सप्टेंबर 2024 पासून सुरू केली आहे . ही पदयात्रा रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे .
सोनम वांगचूक यांच्या जीवनावर आधारित ‘थ्री इडीयटस ‘ हा सिनेमा खूप गाजला होता . लडाख प्रांतातील लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले . ते यशस्वी झालेले आहेत .’थ्री ‘ सिनेमा नंतर त्यांचे कार्य भारतातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सर्वांना कळाले .
चार मागण्या
* लडाख प्रांताला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देणे आणि विधानसभा निवडणुका घेणे .
* संविधानाच्या सहाव्या सूचीचा विस्तार करणे
* लडाख साठी लोकसेवा आयोगाची स्थापना करून रिक्त जागा भरणे
* लडाख आणि कारगिल साठी हे दोन स्वतंत्र लोकसभा मतदार संघ करून निवडणुका घेणे
यात चार मागण्यासाठी सोनम वांगचूक यांनी मार्च 2024 मध्ये लडाख येथे 21 दिवसांचे उपोषण केले होते . मात्र नंतर लोकसभा निवडणूक असल्यामुळे त्यांनी हे उपोषण स्थगित केले होते .21 दिवस उपोषण करूनही त्यांच्या मागण्यांचा केंद्र सरकारने काहीच विचार केला नाही .अखेरीस सोनू वांगचुक यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चलो दिल्ली पदयात्रा सुरू केली आहे .ही पदयात्रा 2 सप्टेंबर 2024 रोजी लेह येथून सुरू झाली असून 1000 किलोमीटरचा प्रवास करून दोन ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे
वांगचुक यांनी आरोप केला आहे की उद्योगपतींना लडाख प्रांतातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करायचा आहे .या उद्योगपतींनी आणलेल्या दबावामुळे लडाख प्रांताला जनजातीय क्षेत्राचा आणि पूर्ण राज्याचा दिला जात नाही . दिलेले आश्वासन पूर्ण केले जात नाही .ते पुढे म्हणाले की धडकन लडा पहाडी विकास परिषदेच्या परवानगीशिवाय या परिसरामध्ये विविध प्रकल्प उभारले जात आहेत
सोनम वांगचुक यासंदर्भात बोलताना म्हणाले की लडाख हा प्रांत पाकिस्तानच्या सीमेलगत आहे . जीवाची जोखीम घेऊन आम्ही येथे राहतो .या परिस्थितीतही आम्ही देशाभिमान बाळगून येथे राहतो . सर्व भारतीयांना याचा अभिमान वाटला पाहिजे . ज्यावेळी जम्मू आणि काश्मीर ला स्वतंत्र वेगळे करून राज्याचा दर्जा दिला, त्यावेळी लडाख प्रांताला अनेक आश्वासने देण्यात आली होती .मात्र या आश्वासनांची पूर्तता अद्यापही करण्यात आलेले नाही ..त्यामुळे आम्हाला ही पदयात्रा काढावी लागली आहे .
सोनम वांगचूक पुढे म्हणाले माझे वय झालेले असल्यामुळे 1000 किलोमीटर प्रवास मी पूर्णपणे चालू शकेल असे वाटत नाही . जेवढे शक्य होईल तेवढे या पदयात्रेत मी कार्यकर्त्यांसोबत चालणार आहे . मला आनंद वाटतो की या पदयात्रेमध्ये केवळ जेष्ठ व्यक्तीच नाही तर महिला, तरुण मुले – देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत .