Thursday, November 21, 2024
Homeकलारंजनगाभ चित्रपट : दादू, फुलवा आणि रेडा तुमच्या भेटीला

गाभ चित्रपट : दादू, फुलवा आणि रेडा तुमच्या भेटीला

अनुप जत्राटकर या तरुण दिग्दर्शकाची मराठी रसिकांसाठी भेट

अनुप जत्राटकर या तरुण दिग्दर्शकाचा ‘गाभ’ हा ग्राामीण जीवनातील तरुण पिढीची कहानी सांगणारा चित्रपट 21 जून 2024 रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. सर्वांनी आवर्जून चित्रपट गृहात जाऊन पाहावा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची माहिती दिली आहे. रवींद्र चिंचोलकर यांनी.

मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्या काळात शंकर पाटील,  रा. रं.  बोराडे हे ग्रामीण कथाकार गाजत होते . त्यावेळी बोराडे सरांची ‘मी ,ती आणि तिची म्हैस ‘ही कथा ऐकली होती , तेव्हा हसून हसून मुरकुंडी वळली होती.  दादा कोंडकेच्या एका चित्रपटात नायक रेडयावर बसून

 “ आला महाराजा, सोबत बेंडबाजा

कोणी म्हणे आला यमराज

करू दुनियेवरती राज”

हे  अफलातून गाणे ऐकले होते . ग्रामीण जीवनाचे चित्रण जेव्हा होते तेव्हा तेथील भाषा, शेती, प्राणी, पक्षी यांचा संदर्भ येणे स्वाभाविक असते .हे सगळे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे आमचे मित्र अलोक जत्राटकर यांचे बंधु अनुप जत्राटकर यांनी मराठी रसिकांसाठी ‘ गाभ’ नावाचा चित्रपट काढला आहे . कोल्हापुरी भाषेचा ठसका असणारे संवाद यात आहेत . तरुणाईच्या प्रश्नांची विनोदी बाजाने मांडणी करणाऱ्या या चित्रपटात नायक, नायिका या दोन पात्रांसोबत रेडा हे तिसरे पात्रही महत्वाच्या भूमिकेत आहे .

अनुप जत्राटकर यांनी यापूर्वी शिकार, हॅपी इंडिपेडन्स , द कॉन्ट्रॅक्ट, समर, डब्लू आदी  लघुपट तयार केले, त्या लघुपटांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘स्मोकिंग झोन’ या त्यांच्या लघुपटाला आठ पुरस्कार मिळाले.   ‘गाभ’  या चित्रपट प्रदर्शानापूर्वीच 36 राष्ट्रीय  – आंतरराष्ट्रीय स्तरावरील  चित्रपट महोत्सवात  दाखविण्यात आलाव या चित्रपटाने अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात शासनाच्या वतीने ‘गाभ’ चित्रपट अधिकृतरित्या निवडण्यात आला. कान्स येथे या चित्रपटाचा प्रिमिअर शो झाला.  

 हाती फारशी साधने नसताना नव्या दमाच्या कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी हा चित्रपट तयार केला आहे . हा चित्रपट त्यांनी तयार करायला घेतला , तेव्हा मधल्या दोन वर्षाच्या काळात कोविड आणि लॉकडाऊनच्या कारणामुळे खूप अडचणी आल्या . टीममधला एक महत्वाचा साथीदार गमावला गेला . या सर्व अडचणींवर मात करून अनुप जत्राटकर आणि सहकाऱ्यांनी ‘गाभ’ चित्रपट तयार करण्याचे स्वप्न जिद्दीने साकार केले .

या चित्रपटातून प्राणी आणि मानवाच्या भावबंधावर भाष्य करण्यात आले आहे. हा. अभिनेता कैलास वाघमारे याने दादू ही  महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

यदाकदाचित, अलबत्या – गलबत्या नाटकातील भूमिकांमुळे गाजलेली  सायली बांदकर नायिका फुलवाची भूमिका  साकारीत आहे.त्यासाठी त्यांना कोल्हापुरी भाषेचा सराव करावा लागला.    विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या यात भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गानू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी कै.सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत. या चित्रपटातील दोन गाणी चित्रपट  प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप गाजत आहेत. ‘तुझ्यापायी  मन झालं येडं रं खुळं’  तसेच  ‘ मी तुझा  रेडा  तू माझी म्हस’ ही गाणी खूप गाजत आहेत. 

सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments