2250 कोटी रुपयांच्या लाचखोरीचे व फसवणुकीचे आरोप
नवी दिल्लीः अमेरिकेतील एका न्यायालयाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आणि त्याचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर न्यूयॉर्कच्या न्यायालयात 26.5 कोटी डॉलर (सुमारे 2250 कोटी रुपये) लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या बातमीमुळे अदनी यांच्या कंपन्यांच्या शेअरर्सचे भाव 20 टक्केपेक्षा अधिक कोसळले आहेत.
गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीज खरेदी करार मिळवण्याच्या एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना 26.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,200 कोटी रुपये) लाच दिल्याचे अमेरिकन सरकारी वकिलांनी आरोप केले आहेत.अमेरिकेच्या न्यायाधीशांनी या प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले आहे.न्यायालयीन दस्तऐवजांवरून असे दिसून येते की अमेरिकी सरकारी वकील हे वॉरंट भारतीय कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची योजना आखत आहेत.
गौतम अदानी, सागर अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन असे अमेरिकन सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. जैनने अमेरिकन गुंतवणूकदार आणि कर्जदारांकडून आपला भ्रष्टाचार लपवला आणि 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 24,000 कोटी रुपये) कर्ज आणि रोख्यांमध्ये जमा केले.अमेरिकी अधिकाऱ्यांनी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर रोखे घोटाळ्याचा कट रचल्याचा आणि रोखे आणि वायर घोटाळ्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
लाच देऊन कंत्राट मिळविले
गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह इतर सात सहकाऱ्यांनी 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 16,000 कोटी रुपये) पेक्षा जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने भारतीय अधिकाऱ्यांना प्रचंड लाच देऊन वीज खरेदीचे कंत्राट मिळवले, असा आरोप अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे.
एसईइसीचीही स्वतंत्र कारवाई
यू. एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसी) गौतम अदानी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध अमेरिकेच्या फसवणूक विरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत स्वतंत्र नागरी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर आर्थिक दंड आणि इतर निर्बंधांची मागणी करण्यात आली आहे.
अदानी ग्रीन आणि तिच्या संलग्न संस्थांसाठी हे वीज खरेदी सौदे सुरक्षित करणे महत्त्वाचे होते जेणेकरून त्यांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण करू शकतील आणि फायदेशीर राहू शकतील. त्यामुळे त्यांनी हे सौदे मिळवण्यासाठी लाच देऊ केली. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आरोपींनी 2021 आणि 2022 मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यास सुरुवात केली, तेव्हा 5 भारतीय राज्ये किंवा प्रदेशांच्या वीज वितरकांनी त्यांच्याकडून वीज खरेदी करण्यासाठी करार केले. त्यावेळी अदानीच्या कंपनीनेही एक निवेदन जारी केले होते, ज्यात या सौद्यांचे वर्णन जगातील सर्वात मोठा वीज खरेदी करार असे केले होते असा आरोप आहे.
रोखे विक्री थांबविली
अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी गौतम अदानी आणि मंडळाच्या इतर सदस्यांवर 25 कोटी डॉलर्सच्या लाचखोरी योजनेत सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर, अदानी ग्रीन एनर्जीने गुरुवारी, 21 नोव्हेंबर रोजी त्याच्या 60 कोटी डॉलर्सच्या अमेरिकन डॉलर्सच्या रोख्यांद्वारे निधी उभारण्याच्या योजनेसह पुढे न जाण्याचा निर्णय घेतला ााहे. रोखे विकी बंद केली आहे.
न्यायालयात जाऊ
अदानी यांच्या प्रवक्त्याने अमेरिकेतील आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळले आहेत. आम्ही न्यायालयात दाद मागू असे त्यांनी म्हटले आहे.