न्यूयॉर्क – जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या दोन मांजरी तुम्हाला ठाऊक आहेत का? त्यातील पहिलीचे नाव आहे नाला, दुसरीचे नाव आहे ओलिविया बेन्सन.
या मांजरी जाहिरातीतून तसेच इन्स्टाग्राामवरील पोष्टव्दारे एवढे पैसी मिळवतात ते आकडे पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल. भारतातील मोठया नट – नट्या कमावतात त्यापेक्षा अधिक पैसे या मांजरी कमावतात.
यातील पहिल्या मांजरीचे नाव आहे नाला. नाला मांजरीची एकूण संपत्ती 10 कोटी डॉलर आहे. नालाचे इन्स्टाग्रामवर 4.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. गुंथर नावाचा जर्मन शेफर्ड कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तो गुंथर कॉर्पोरेशन या इटालियन माध्यम कंपनीच्या मालकीची आहे. 500 दशलक्ष डॉलर्सच्या संपत्तीसह तो जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे.
एका पोष्टमधून 13 लाख कमाई
नाला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहते. ती तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरून 13 लाख रुपयांहून अधिक कमावते. या मांजरीची मालक वरिसिरी माथाचिट्टीफन (पूकी ) नावाची महिला आहे.
पूकीच्या म्हणण्यानुसार, नाला मांजरीला रेस्कू सेंटरम्ध्ये पाहिल्यानतर तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.’ धिस मॉर्निंग ‘ नावाच्या एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात ती असते. पूकी दावा करते की तिची मांजर ही इंटरनेट पोस्टवर बोलणारी जगातील एकमेव प्राणी आहे. तिच्या पोस्टमुळे तिचे चाहते नेहमीच आश्चर्यचकित होतात.
नाला मांजर खाद्यपदार्थांचा एक ब्रँड देखील चालवते. इतकेच नाही तर नाला हा मांजरीच्या खाद्यपदार्थांच्या एका ब्रँडची ती मालक देखील आहे. नालाने स्वतः तिचा स्वतःचा व्यापारी ब्रँड सुरू केला आहे. पूकी अनेकदा तिच्या मांजरीसोबत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करते. त्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. नाला यांच्या 7267 पोस्ट इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आल्या आहेत. नालाला सोशल मीडियावर 4.5 दशलक्ष (45 लाख) फॉलोअर्स आहेत. नाला एका पोस्टमधून 12 हजार पौंड कमावते.
ओलिविया बेन्सन
ग्रॅमी पुरस्कार विजेती पॉप गायिका टेलर स्विफ्टकडे ओलिविया बेन्सन नावाची एक गोंडस स्कॉटिश फोल्ड मांजर आहे. टेलर स्विफ्टचे तिच्या मांजरीवर खूप प्रेम आहे. तिची मांजर जगातील दुस-या क्रमांकाची श्रीमंत मांजर आहे. होय, टेलर स्विफ्टप्रमाणेच आता तिची मांजर ओलिविया बेन्सनही जगभरात प्रसिद्ध झाली आहे.ओलिविया बेन्सन या मांजरीची संपत्ती एवढी असण्याचे कारण तिच्या अनेक जाहिराती आणि संगीत व्हिडिओंमुळे आहे.
2014 मध्ये, ऑलिव्हियाने पादत्राणे कंपनी केड्ससाठी मॉडेल म्हणून पदार्पण केले आणि टेलरच्या ‘मी’ तसेच ‘ब्लँक स्पेस’ या संगीत व्हिडिओंमध्ये ती दिसली. यानंतर, ऑलिव्हिया टेलरसोबत अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. ऑलिव्हियाला तिच्या इन्स्टाग्राम पोस्टसाठी पैसेही मिळतात.