नवी दिल्ली – भारतीय खाद्यपदार्थ जगात प्रसिध्द आहेत. जगात कोठेही गेले तरी भारतीय रेस्टॉरंटस आपणास पाहायला मिळतात. न्याहरीसाठीच्या जगभरातील सर्वोत्तम पर्यायात तीन भारतीय पदार्थांची निवड झाली आहे, त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भारतात पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्यासाठी विविध पदार्थ उपलब्ध आहेत.ते आपल्या स्थानिक संस्कृती आणि समुदायांमध्ये खोलवर रुजलेले आहेत, कारण देशभरातील लोक त्यांच्यासोबत त्यांचा दिवस सुरू करतात. अलीकडेच, टेस्ट अॅटलासने जगातील 50 सर्वोत्तम नाश्त्यामध्ये तीन भारतीय आवडत्या पदार्थांची समाविष्ट केली आहेत. जून २०२५ च्या क्रमवारीनुसार जगातील सर्वोत्तम नाश्त्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील मिसळ पाव १८ व्या क्रमांकावर आहे, पराठा (एक व्यापक श्रेणी म्हणून) २३ व्या स्थानावर आहे आणि दिल्लीचा प्रिय छोले भटुरे एकूण ३२ व्या क्रमांकावर आहे.
मिसळ
मिसळ हा महाराष्ट्रीयन पाककृतींपैकी एक आहे. महाराष्ट्रात आत मिसळचे ब्रँडिंग केल्याने मिसळ अधिक लोकप्रिय झाली आहे. जोगेश्वरी, ऑस्करवाडी , नाशिकची सीताबाईची मिसळ, पुणेरी मिसळ, कोल्हापूरची दत्त मिसळ यासह गावोगावच्या मिसळी प्रसिध्द आहेत. जागतिक स्तरावर मिसळ पाव 18 व्या क्रमांकावर आल्याने आता जगात जास्त प्रसिध्द होईल.
पराठा
यादीतील दुसरा भारतीय पदार्थ आहे पराठा . पराठे प्रमुख्याने पंजाब आणि उत्तर भारतीय पाककृतींशी संबंधित आहेत. तथापि, ते देशाच्या इतर भागात देखील लोकप्रिय आहेत आणि त्यांचे स्वतःचे प्रादेशिक प्रकार देखील आहेत. आलू पराठा, मेथी पराठा, गोबी पराठा, पालक पराठा ,पनीर पराठा, कांदा पराठा , अजवान पराठा आदी प्रकार प्रसिध्द आहेत.
छोले भटुरे
छोले भटुरे हा प्रकार उत्तर भारतीय आहे. मात्र आता भारतात सर्वत्र मिळतो
जरी टेस्ट अॅटलसने इंस्टाग्रामवर फक्त टॉप ५० ब्रेकफास्टची नावे उघड केली असली तरी, त्यांच्या वेबसाइटवरील अलिकडच्या यादीत ५१ ते १०० पर्यंतच्या क्रमांकावर असलेल्यांचाही समावेश आहे. येथे, निहारी, श्रीखंड आणि पालक पनीरसह अधिक भारतीय पदार्थ समाविष्ट आहेत.