Thursday, November 21, 2024
Homeबातम्याजनगणना होणार सुरू

जनगणना होणार सुरू

नवी दिल्ली – भारत सरकार लवकरच नव्या जनगणनेस सुरुवात करणार आहे . 2021 सालीच जनगणना होणार होती ती कोविड मुळे वेळेत होऊ शकली नव्हती . आता जनगणनेसाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे .

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना करण्यास लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे . जातीनिहाय जनगणना करण्याबाबतही विचार केला जाईल असेही ते म्हणाले .

दर दहा वर्षांनी भारतात जनगणना केली जाते , मागील जनगणना 2011 मध्ये झाली होती त्यामुळे पुढील जनगणना 2021 पर्यंत होणे अपेक्षित होते . मात्र 2019 मध्ये जगभरासह भारतात कोविड ची साथ आल्यामुळे जनगणनेचे काम सुरु होऊन ते काम 2021 पर्यंत पूर्ण होऊ शकले नाही .

आता जनगणनेचे काम सुरु होणार आहे . जनगणना आयोजित करण्याच्या दृष्टीने आधीच तयारी सुरु झाली आहे . जनगणनेचे काम सुरु करण्याची घोषणा लवकरच होईल . जातीनिहाय जनगणना 1931 साली झाली होती . केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेले काही पक्ष जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करीत आहेत .सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती साठीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे . त्यासाठीही जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे ठरणार आहे .

ही जनगणना पहिलीच डिजिटल जनगणना असेल, ज्यामुळे नागरिकांना स्वत:ची नोंद करण्याची संधी मिळेल. जनगणनेचे काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी सुमारे 18 महिने लागतील. अहवालानुसार, जनगणना आयोजित करण्यात पुढाकार घेणारे गृह मंत्रालय आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने एक वेळापत्रक तयार केले आहे . दोन वर्षांच्या कालावधीत मार्च 2026 पर्यंत निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments