माणूस मानण्याची जीवास आस आहे
देवी नका म्हणू मज त्याचाच त्रास आहे
राणी म्हणून आले, दासी बनून गेले
भलताच घसरणीचा माझा प्रवास आहे
आत्ताच जीवनाचा समतोल साधलेला
हे सत्य की मनाचा, नुसताच भास आहे
लक्ष्मी घरात आली, माझ्याच पावलांनी
होतोय का तरीही, माझाच ऱ्हास आहे
आभास स्वामिनीचा, सत्ता कुठेच नाही
बनलेय नामधारी, माझा कयास आहे !
*डॉ. रेखा अनिल ढगे