मुंबई- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने 84.10 हा सर्वकालीन नीचांक आज गाठला आहे. रुपयाच्या इतिहासातील ही सर्वात नीचांकी पातळी आहे.
अलिकडेच कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या विक्रीमुळे रुपयावर दबाव आला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 83.9900 वर घसरला. यापूर्वी हा निर्देशांक 83.9850 इतका होता. रुपया 12 सप्टेंबरला या पातळीवर पोहोचला होता. सुरुवातीच्या व्यापारात त्यात दोन पैशांची वाढ झाली होती, परंतु दिवसभरात त्यात आणखी घसरण झाली.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच राहिल्यास परदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल.भारत सरकारला आयातीवर अधिक खर्च करावा लागेल, ज्याचा परकीय चलन साठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची अपेक्षा आहे.भारतातील विद्यार्थ्यांना फी आणि इतर खर्चांवर परदेशात अधिक खर्च करावा लागेल, ज्यामुळे शिक्षण आणि जीवन जगणे महाग होईल. परदेशातून वस्तू आयात करण्यासाठी अधिक रुपये खर्च येईल आणि त्यानंतर भारतीय चलनाची स्थिती आणखी खालावेल अशी भीती आहे.
कच्च्या तेलाचा भाव 0.28 टक्क्यांनी घसरून 85.51 डॉलर प्रति बॅरलवर आला. भारतीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी भांडवली बाजारात निव्वळ खरेदीदार म्हणून 60.98 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
देशाचा परकीय चलन साठा आणि सोन्याचा साठा कमी झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ही माहिती दिली आहे. त्याच वेळी, गेल्या काही आठवड्यांपासून भारताचा परकीय चलन साठयात होत असलेली वाढ थांबली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या म्हणण्यानुसार, 4 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 3.71 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 701.18 अब्ज डॉलर्स झाला आहे. या आठवड्यात सोन्याचा साठा 4 कोटी डॉलरने कमी झाला आहे. या घसरणीमुळे तो 65.75 अब्ज डॉलर्सवर आला आहे.