पुणे – पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाने गतवर्षी चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले होते आणि यावर्षी हा महोत्सव पाच गिनिज विक्रम मोडण्याचा प्रयत्न करीत आहे असे समन्वयक बागेश्री मंथालकर म्हणाल्या .
14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजिलेल्या या पुस्तक महोत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महोत्सवात पुस्तकांचे 600 स्टॉल्स, संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, प्रशिक्षण सत्रे आणि चित्रपट प्रदर्शनांचे आयोजन केले 600 हून अधिक स्टॉल्सवर अनेक भारतीय भाषांमधील पुस्तके प्रदर्शित केली आहेत. पुणे पुस्तक महोत्सवात यंदा 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत साहित्य उत्सवाचे आयोजन केले आहे. यात विविध विषयांवर 25 पेक्षा अधिक सत्र होणार आहेत. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार असून, ते मोफत राहणार आहेत. 60 हून अधिक लेखक, कवी, पत्रकार आणि मोठे विचारवंत यात सहभागी होणार आहेत. . चर्चा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एम्फीथिएटरमध्ये होतात यात कोणीही सहभागी होऊ शकतो.
पुण्यात दहा हजार पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम 13 डिसेंबर रोजी नोंदवण्यात आला. पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. विविध निकषांवर मूल्यमापन करून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले. विश्वविक्रमी कलाकृतीसाठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला. विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान एक हजार चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृतीचे मूल्यमापन करण्यात आले.
या विश्वविक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अॅड. मंदार जोशी, डॉ. संजय चाकणे, गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वर्लेकर उपस्थित हो
एनबीटीचे विश्वस्त राजेश पांडे म्हणाले, “जागतिक विक्रमापासून सुरुवात केल्याने पुण्याची समृद्ध साहित्यिक संस्कृती आणि पुस्तकांशी असलेला सखोल संबंध प्रतिबिंबित होतो”.पुस्तकांचे स्टॉल्स दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असतील, ज्यामुळे अभ्यागतांना एक तल्लख आणि चैतन्यदायी साहित्यिक अनुभव मिळेल.