सोलापूरच्या अठरा वर्षीय किर्ती भराडियाचा विश्वविक्रम
सोलापूर – सोलापूर येथील .किर्ती नंदकिशोर भराडिया हिने श्रीलंकेपासून भारतापर्यंत 32 किलोमीटरचे अंतर समुद्रात 10 तास 25 मिनिटे न थांबता पोहून पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे.
किर्ती भराडिया हिने 20 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 1 .45 वाजता तलाईमनार (श्रीलंका) येथून समुद्रात पोहण्यासाठी सुरुवात करून न थांबता याच दिवशी दुपारी 12.10 वाजता धनुष्यकोडी (भारत) येथे पोहोचली.
या पोहण्याच्या प्रवासात किर्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले . माशांच्या वासाने तिला उलट्या झाल्या . तरीही जिद्द न सोडता तिने ही मोहीम पूर्ण केली .
वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीच्या अधिकाऱ्यांनी “*लाँगेस्ट नॉन-स्टॉप ट्रान्सनॅशनल स्विम बाय अ चाइल्ड*” हे पुस्तक देऊन तिचा गौरव केला आहे. य
दोन वर्षा पूर्वीही 16 वर्षाच्या जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने अरबी समुद्रात तब्बल 7 तास 22 मिनिटं पोहत 37 किमी अंतर पार केले. मुंबईतील वरळी सी लिंक येथून तिने पोहायला सुरुवात करून गेट वे ऑफ इंडिया गाठले.वयाच्या सहाव्या वर्षांपासून कीर्ती सोलापूरमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
कोरोना काळात कीर्ती तब्बल २ वर्षे सरावापासून दुरावली होती. त्यानंतर तिने दिवसातून ८ ते १२ तास सराव सुरु ठेवला. जेव्हा तिचा सराव पूर्ण झाला, त्यावेळेस तिने ३७ किमी पोहण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. समुद्रामधील अडचणींवर मात करण्यासाठी ती म समुद्रातदेखील सराव करत होती. यावेळी समुद्रामध्ये पोहताना काय अडचणी येऊ शकतात? हे समजून घेतले. त्याप्रकारे तिच्या सरावाचे नियोजन केले.
अरबी समुद्रात पोहण्याचा विक्रम केला तेव्हाच कीर्तीने श्रीलंका ते भारत असे अंतर गाठणे हे नवे उद्दिष्ट समोर ठेवले होते . ठरविल्यानुसार तिने हा विक्रम पूर्ण केला . आ
22 सप्टेंबर 2024 रोजी कीर्ती सोपापुरात पोहोचली .सोलापुरातील माहेश्वरी समाजातर्फे मिरवणूक काढून तिच्या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला