Home शिक्षण बातम्या प्राध्यापकांच्या 4435 जागा भरण्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही

प्राध्यापकांच्या 4435 जागा भरण्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही

0
10

शिक्षणमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई – महाराष्ट्र रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या 4435 जागा भरण्यासाठी मुक्त विभागाची परवानगी मिळालेली नाही . सध्या केवळ 659 जागा भरण्यास मान्यता दिलेली आहे असे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले .

सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेमध्ये प्राध्यापक भरतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता .या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यातील महाविद्यालयाने विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्यास महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सहा महिन्यापूर्वी स्थगिती दिली होती .त्यामुळे भरती करता येत नव्हती .प्राध्यापकांची भरती गुणवत्तेच्या आधारे व्हावी या दृष्टिकोनातून राज्यपालांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत प्राध्यापकांची ही भरती करावी अशी अपेक्षा होती .दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी ) ने पत्र पाठवून कळविले आहे की प्राध्यापकांची भरती विद्यापीठांनीच करायला हवी.त्यानंतर मागील आठवड्यात राज्यपालांनी प्राध्यापक भरतीवरील स्थगिती उठवली आहे .

सध्या प्राध्यापकांच्या 659 जागा भरायला परवानगी दिली आहे असे सांगत शिक्षण मंत्री पाटील पुढे म्हणाले की या जागांची भरती लगेच सुरू होईल . मात्र 2017 पासून विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या 4435 जागा भरण्यासाठी वित्त विभागाची परवानगी अजून मिळालेली नाही .

आता जरा लक्ष देऊन ऐका असे म्हणत शिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले की वित्त विभागाचे म्हणणे असे आहे की 4435 जागा भरण्याला परवानगी हवी असेल तर 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार (वर्क लोड ) ची फेर तपासणी करा . गंभीर विषय असूनही या विधनावर सभागृहात हशा पिकला . शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की मी चाळीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले आहे .त्यामुळे मी वित्त विभागाला सांगितले आहे की नवीन जागांचे राहू द्या मात्र किमान 2017 पासून निवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागा भरायला तरी परवानगी द्या .यावर लवकरच तोडगा निघेल आणि महिन्याभरामध्ये निर्णय होईल असे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले ..

नवीन शैक्षणिक धोरण 2020 आल्यानंतर प्राध्यापकांचा कार्यभार कमी होईल आणि त्यामुळे प्राध्यापक अतिरिक्त होतील त्यांच्या नोकऱ्या जातील अशी शंका विविध विद्यापीठांमधील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक संघटनांनी व्यक्त केली होती .मात्र त्यावेळी 2020 चे शैक्षणिक धोरण समजावून सांगण्यासाठी आलेल्या तज्ञांनी कोणत्याही प्राध्यापकावर कामावरून कमी होण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली होती . मात्र आता प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास मंजुरी हवी तर 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार वर्कलोडची फेरतपासणी करा हे म्हणणे म्हणजे वर्कलोड कमी होणार आणि प्राध्यापकांची संख्या कमी होणार असा संकेत देते .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here