नाशिक – नाशिक शहरातील मुंबई नाका येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शनिवार, दि.२८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्रीअजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण म्हणून पुण्यातील भिडे वाड्यातही त्यांचे भव्य स्मारक उभारणार येईल . सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील स्मारकाला देखील १०० कोटींचा निधी दिला असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी करणार आहोत . यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाजसुधारकात महात्मा फुलेंचे नाव हे सर्वात अग्रभागी आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार नष्ट करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले . मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार अभेद्य राहिलेले आहेत .नाशिक येथे उभारण्यात आलेले फुले दांपत्याचे पुतळे ही असेच अभेद्य राहतील .
पुतळ्यांची वैशिष्ट्ये
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आशिया खंडातील ब्राँझ धातूने तयार केलेले सर्वात उंच मोठे पुतळे आहेत . .या पुतळ्यांची निर्मिती बाळकृष्ण दाजी पांचाळ या ख्यातनाम मूर्तीकारांनी केली आहे .पुतळे बनविण्यास जवळपास पाच कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे .
नांदेडला पूर्णाकृती पुतळे
महाराष्ट्रातील फार थोडे ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे या दोघांचे एकत्रित पुतळे उभारण्यात आहेत . याआधी नांदेड शहरांमध्ये असे एकत्रित पुतळे उभारण्यात आलेले आहेत, ते पूर्णाकृती पुतळे आहेत . .