जेंव्हा सिध्दार्थाचा बुध्द झाला
तेव्हा पिंपळाचा बोधीवृक्ष झाला
मनात वाढला बुध्दाचा वावर
आयुष्य माझे झाली चीवर
अष्टांग मार्ग जेव्हा अनुसरला
विकार कोठेच नाही उरला
बुध्द नसावा फक्त ओठी
बुध्द भिनावा आतल्या देठी
पंचशीलार्थ व्हावे व्याकुळ
दुःख संपते तेव्हाच समूळ
- अनिकेत कुलकर्णी , नांदेड
( अनिकेत कुलकर्णी , नांदेड यांच्या फेसबुक भिंतीवरुन साभार )