‘नाशिक – नाशिक येथील पुष्परत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे रविवार दि.9 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कवीसंमेलनाचे आयोजन केले आहे .यात भीमाबाई जोंधळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटक नरहरीजी झिरवाळ,अन्न व औषध प्रशासन मंञी महाराष्ट राज्य व प्रमुख पाहुणे मा.शर्मिष्ठा घारगे वालावलकर,एसपी,ॲण्टी करप्शन,नाशिक,.इंजि.सिमंतिनी माणिकराव कोकाटे,.सुप्रसिध्द अभिनेञी निशा परुळेकर यांच्या हस्ते पुस्तकांची आई भीमाबाई जोधळे यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम,मानाचेसन्मानचिन्ह,सन्मानपञ,मानवस्ञ,मानाचा फेटा,सागर आडगांवकर ज्वेलर्स कडून चांदीची फ्रेम असे असणार आहे. पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे या 75 वर्षाच्या आई असून नाशिक जवळ दहावा मैल येथे चहाच्या छोट्याशा टपरीपासून आज पुस्तकांचे हाॅटेल सुरु केले आहे.वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यात आईचा खुप मोठा हातभार आहे.म्हणून या वर्षी महाराष्ट शासनाने मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी मा.आईला कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार उपमुख्यमंञी मा.एकनाथ शिंदे व मा.अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून दोन लाख रुपये,सन्मानपञ व सन्मानपञ असे पुरस्काराचे स्वरुप होते.आईला विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात महाराष्टातील 51 महिलांना पुष्परत्न काव्यगौरव,हिरकणी,झलकारी,आदर्श प्रशासकीय अधिकारी,समाजरत्न व महाराष्ट भूषण अशा विविध पुरस्कारानी सन्मानित करणार आहोत.तर विविध ठिकाणच्या कवयिञी कवीसंमेलनात सहभागी होणार आहेत.अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक पुष्परत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा.डाॅ.आनंद आहिरे यांनी दिली.