नेटक-यांची धमाल टोलेबाजी
नवी दिल्ली – फरार उद्योगपती विजय मल्ल्याने केलेल्या एका विधानावरुन नेटक-यांनी तुफान टोलेबाजी सुरु केली आहे. ‘भावा, भारतात परत ये, लोक तुझ्या कँलेडरला मुकले आहेत. ये आणि देशवासियांना कॅलेंडर वाट ‘ यासह एकापेक्षा एक धमाल प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले की बँकांनी विजय मल्ल्याची 14,131.6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आणि ती संपत्ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत केली. अर्थमंत्री सीतारामन यांच्या विधानावर टीका करताना फरार उद्योगपती मल्ल्या म्हणाले की, कर्ज वसुली न्यायाधिकरणाने केएफएचे कर्ज 1200 कोटी रुपयांच्या व्याजासह 6203 कोटी रुपये ठरवले. अर्थमंत्र्यांनी संसदेत जाहीर केले की, माझ्यापासून 14,131.60 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि मी अजूनही आर्थिक गुन्हेगार का आहे ?. ईडी आणि बँका कर्जाच्या दुप्पट वसुली करुन त्याचे समर्थन करू शकत नाहीत. मला दिलासा मिळण्याचा हक्क आहे, ज्याचा मी पाठपुरावा करेन., असे मल्ल्याने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
विजय मल्ल्यांच्या या विधानावर नेटक-यांनी धमाल प्रतिकिया दिल्या आहेत. ‘सर आप वापस आ जायिये, देशवासिंको को साल मे एक बार हसीन कॅलेंडर तो मिल जाता’. एस. कुमार यांनी म्ह्टले आहे ‘बैंक का कर्ज तो वापस कर दे भाई। जब से तू लूट कर भागा है तब से एकाउंट में मिनिमम बैलेंस रखने की नीति आ गई है भारत में। अब भारतीय बैंक मिनिमम बैलेंस के नाम पर हमारा खून चूस रहे हैं।’
विजय मल्ल्या नेहमी बँक सुटीच्या दिवशी व्टिट करतात. यावेळी बँका सुरु असलेल्या दिवशी व्टिट केल्यांने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत म्हटले आहे ‘चचा ओ चचा! आज तो कोई छुट्टी नहीं थी और न ही कल है। पहली बार आपने छुट्टी के सिवा किसी और दिन पर ट्वीट किया है। मेरा तो आपसे विश्वाश ही छूट गया।‘
एका यूजरने म्हटले ााहे ” मी मल्ल्या यांना मानतो , कारण त्यांनी सर्वात चांगली विमान सेवा सुरु केली आणि सर्वात चांगली मद्य निर्मिती केली. एकाने म्हटले आहे, मल्ल्या यांना भारतात परत आणा , ते आमच्या बंगळुरुचे सरताज आहेत.
पत्रकार सुचेता दलाल यांनी म्ह्टले आहे ” मल्ल्या म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे, कारण अनिल अंबानींचे कर्ज माफ करण्यात आले.