Tuesday, December 30, 2025
Homeशिक्षणबातम्यास्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्र युजीसीने निधी बंद केला

स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्र युजीसीने निधी बंद केला

पुणे विद्यापीठतील प्रशिक्षण केंद्र . बंदच

. . ‘

.पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मागास प्रवर्गातील .विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा होती . मात्र या प्रशिक्षण केंद्राला विद्यापीठ अनुदान आयोग . (यूजीसी ) तर्फे दिला जाणारा निधी मागील नऊ वर्षांपासून बंद करण्यात आलेला आहे .त्यामुळे या विद्यापीठातील हे प्रशिक्षण केंद्र बंद पडले आहे .

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रशिक्षण केंद्र सुरू होते .या प्रशिक्षण केंद्रास विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे निधी दिला जात होता . या प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत ..मात्र 2016 पासून विद्यापीठ अनुदान आयोगाने या प्रशिक्षण केंद्रासाठी निधी देणे बंद केले आहे . तसेच.2025 – 26 या शैक्षणिक वर्षासाठी तर हे प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी परवानगी देखील दिली गेलेली नाही . त्यामुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेले हे प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आलेले आहे .

या प्रशिक्षण वर्गात अनुसूचित जातीचे 20, अनुसूचित जमातीचे 10, इतर मागास वर्गातील 9,दुर्बल आर्थिक घटकातील 5 आणि अल्पसंख्याक व खुल्या गटातील 4 अशा एकंदर 48 विद्यार्थ्यांना 11 महिने प्रशिक्षण दिले जात असे .यात प्रामुख्याने नागरी सेवा स्पर्धात्मक परीक्षांबाबत प्रशिक्षण दिले जाई .या प्रशिक्षणात तज्ञ प्राध्यापक तसेच स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार हे मार्गदर्शन करीत असत .या केंद्रामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांन छात्रवृत्ति शिष्यवृत्ती तसेच वसतिगृह प्रवेशाच्या आणि ग्रंथालयाच्या सुविधा देखील मिळत असत .मात्र मागील नऊ वर्षांपासून या प्रशिक्षण केंद्रास विद्यापीठ अनुदान आयोगाने निधी न दिल्यामुळे तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रशिक्षण केंद्र चालविण्यास परवानगी देखील मिळालेली नसल्याने हे केंद्र बंद पडले आहे .

महाराष्ट्र शासनाने ,विद्यापीठाने तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करून या प्रशिक्षण केंद्रासाठीचा निधी पुन्हा सुरू करून घ्यावा व हे केंद्र चालविण्यासाठी मान्यता कायमस्वरूपी मिळवावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे . .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments