गैरप्रकार झाल्याचे दोन समित्यांचेअहवाल; पुन्हा तिसरी समिती
मुंबई – मुंबई विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव आणि उप कुलसचिव या पदांसाठी 2009 आणि 2013 मध्ये झालेल्या भरतीत . गैरप्रकार झाल्याचा अहवाल दोन समित्यांनी दिलेला असतानाही पुन्हा तिसरी समिती नेमण्यात आली आहे . चौकशी – चौकशीत एक तप उलटून गेले तरी निर्णय होत नाही . .
मुंबई विद्यापीठाने 2009 साठी एक जाहिरात देऊन तसेच 2013 झाली दोन जाहिराती देऊन सहाय्यक कुलसचिव तसेच उपकुलसचिव पदाच्या 30 जागांवर नेमणुका केल्या . या भरतीत अनेक गैरप्रकार झाले आणि अपात्र व्यक्तींच्या नेमणुका करण्यात आल्या अशा तक्रारी आल्या होत्या .
त्यानंतर याविषयीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने चौकशी केली होती . भरतीत मोठे गैरप्रकार झाल्याचे आणि अपात्र व्यक्तींना नेमणुका देण्यात आल्याचे या चौकशीत निष्पन्न झाले .
त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये पुन्हा सखोल चौकशी करण्यासाठी दुसरी समिती समिती नेमण्यात आली .बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू प्रा .आर .एस .माळी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती ‘नेमण्यात आली होती . या समितीनेही आपल्या अहवालात नमूद केले आहे की तीन – चार जण वगळता इतरांच्या कागदपत्रात त्रुटी आहेत . पुरेसा अनुभव नसणे किंवा इतर त्रुटी आढळल्या आहेत . कंत्राटी सिक्षक पदावर काम् केल्याचा अनुभव्ही ग्राय्ह धरण्यात आला आहे. असे असतानाही या व्यक्तींची सहाय्यक कुलसचिव अथवा उपकुलसचिव म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे .
भरती होऊन 12 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. दोन समित्यांचे अहवाल हाती असताना आणि या दोन्ही समित्यांनी या भरतीत गैरप्रकार झाल्याचे आणि अपात्र व्यक्तींना नेमल्याचे अहवाल दिले. अद्यापही निर्नय होत नाही. आता तर पुन्ह उच्च शिक्षण विभागाने पुन्हा तिसरी समिती नेमली आहे .
दोन समित्यांनी भरतीत गैरप्रकार झाल्याचे अहवाल देऊनही उच्च शिक्षण विभागाला मुंबई विद्यापीठात 2009 आणि 2013 मध्ये झालेल्या भरती संदर्भात अंतिम निर्णय घेता आला नाही . आता .या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा . नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आता तिसरी समिती नेमण्यात आली आहे . समित्यावर समित्या नेमण्याचा हा प्रकार अनाकलनीय आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे .