युवासेनेने सर्व दहा जागा जिंकल्या
मुंबई – मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर केलेल्या सिनेट निवडणुकीच्या 10 पैकी 10 जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेने विजय मिळविला आहे .
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने मुंबई विद्यापीठामध्ये निवडणुकांमध्ये कोण बाजी मारते ही बाब महत्वाची मानली जाते .या निवडणुकीत ठाकरे गटाच्या योजनेने युवासेनेने तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्व दहा जागांवर आपापले उमेदवार उभे केले होते .मुख्यमंत्री शिंदे गटाने एकाही जागेवर उमेदवार दिला नव्हता .मनसेने एका जागेवर आपला उमेदवार उभा केला होता छात्रभारतीचे चार उमेदवार रिंगणात होते .10 जागांसाठी 28 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते .
युवासेनेच्या आरक्षित जागांवरील पाच विजयी उमेदवारात मयुर पांचाळ, स्नेहा गवळी, शितल सेठ, धनराज कोहचाडे, शशिकांत झोके यांचा समावेश आहे खुल्या जागांवर प्रदीप सावंत , मिलिंद साटम , परमात्मा यादव , अल्पेश भोईर , किरण सावंत निवडूण आले .9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र 10 दिवसांच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दल परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं होतं.
आशिष शेलार यांनी मतदार यादीत त्रुटी असल्याची तक्रार दाखल केल्याने विद्यापीठ प्रशासनाने सिनेट निवडणूक स्थगित केली होती . अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.आज सकाळी 9 वाजता मतमोजणीस सुरु झाली . 10 जागांसाठी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान झाले होते 7328 लोकांनी मतदान केले आहे. युवासेना आणि अभाविप यांच्यात खरी लढत होती.