Wednesday, March 12, 2025
Homeअर्थकारणविमान कंपन्या नीट सेवा न देता ग्राहकांची लूट करतात

विमान कंपन्या नीट सेवा न देता ग्राहकांची लूट करतात

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचीच तक्रार

नवी दिल्ली – केंद्रीय कृषिमंत्री शिवसेना चव्हाण यांनी एअर इंडियाच्या विमानाने भोपाळ ते दिल्ली प्रवास करत असताना तुटकी सीट दिली .अशी तक्रार केली आहे . विमान कंपन्या ग्राहकांकडून भरपूर तिकीट घेतात मात्र विमानामध्ये असलेल्या सोयी सुविधांकडे लक्ष देत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे . .

कृषी मंत्री चौहान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे कीआज मला भोपाळहून दिल्लीला यायचे होते, पुसा येथे किसान मेळ्याचे उद्घाटन करायचे होते, कुरुक्षेत्र येथे नॅचरल फार्मिंग मिशनची बैठक करायची होती आणि चंदीगडमध्ये शेतकरी संघटनेच्या सन्माननीय प्रतिनिधींशी चर्चा करायची होती.मी एअर इंडिया फ्लाइट नंबर ए. आय. 436 वर तिकीट बुक केले होते, मला सीट नंबर 8 सी देण्यात आला होता. मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि मी आत अडकलो होतो. बसणे कठीण होते.

जेव्हा मी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले की तिथे खराब आसनव्यवस्था आहे, तेव्हा ते वाटप का करण्यात आले? ते म्हणाले की, त्यांनी आधी व्यवस्थापनाला कळवले होते की ही जागा चांगली नाही, तिचे तिकीट विकले जाऊ नये. इतर जागा नाहीत.

सहप्रवाशांनी मला सीट बदलण्याचा आणि चांगल्या सीटवर बसण्याचा खूप आग्रह केला पण मी माझ्यासाठी दुसऱ्या कोणत्याही मित्राला का त्रास देऊ, मी ठरवले की मी या सीटवर बसून माझा प्रवास पूर्ण करेन.टाटा व्यवस्थापनाने पदभार स्वीकारल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असती असे मला वाटत होते, परंतु तो माझा भ्रम असल्याचे सिद्ध झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments