Wednesday, February 5, 2025
Homeशिक्षणबातम्याव्यंगचित्रांना महाराष्ट्र सरकार घाबरतेय .. ?

व्यंगचित्रांना महाराष्ट्र सरकार घाबरतेय .. ?

व्यंगचित्र ही नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरले आहेत. हुकुमशहा हिटलरला देखील व्यंगचित्रांची दखल घ्यावी लागली एवढी ताकद व्यंगचित्रात असते. हुकुमशहा हे नेहमीच वृत्तपत्रे व मीडिया यांना घाबरतात त्याहीपेक्षा जास्त व्यंगचित्रांना ते घाबरतात. डॉ. प्रविण मस्तुद (9960312963) यांचा लेख

सध्या देशात अघोषित आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काळात काही इलेक्ट्रॉनिक न्यूज चैनल वर देखील सरकारने बंदी आणलेली आपण पाहिलेले आहे. अशा पद्धतीची बंदी ही पहिल्यांदाच लागू केलेली आहे. अशावेळी सर्वच अभिव्यक्तींना दाबण्याचा कार्यक्रम सरधोपटपणे चालू आहे.

नुकतेच प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना देखील मुंबई ला इन्फोर्समेंट एजन्सी कडून भांडवलदार अदानी वर टीका करणाऱ्या व्यंगचित्र विरोधात नोटीस बजावली आहे.व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदींचे प्रिय भांडवलदार आदानी यांवर तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्ष बाबत काही व्यंगचित्रे काढली होती. आचार्यांची व्यंगचित्रे सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मुळशी शिवसेना फोडली व गद्दारी करून आमदारांना पळवून नेहेत भाजपा बरोबर हात मिळवणे करत असतात स्थापन केली होती. परंतु 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेनंतर निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते त्यानंतर ते भाजपच्या सांगण्याप्रमाणे नाईलाजामुळे सत्तेत उपमुख्यमंत्री पदावरती सहभागी झाले. सतीश आचार्य यांनी व्यंगचित्रात अगदी सहा व्यंगचित्रांमधून त्यांनी ही एकनाथ शिंदे यांची झालेली अवस्था नोंद केली आहे. या व्यंगचित्रात एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा भाजपच्या दबावाला न जुमानता किमान ठाम उभे असणारे परत मोदींपुढे भुईसपाट झाल्याचे या चित्रात दाखविले आहे. अगदी सत्य परिस्थितीवर हे व्यंगचित्र बोलते. कोणाही सुज्ञ व्यक्तीला हे व्यंगचित्र भावणारे आहे.

दुसरे व्यंगचित्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या त्यापूर्वी त्यांनीही एकनाथ शिंदेंनी जशी शिवसेना फोडली तशीच अजित पवारांनी ही आपले काका शरद पवारांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी पक्ष फोडला व चिन्ह पळविले होते. परंतु 2024 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारादरम्यान शरद पवारांच्या फोटोचा वापर केला होता. अजित पवारांनी मूळची राष्ट्रवादी फोडून ते स्वतः आपल्या काकांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिले होते. परंतु 2024 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारादरम्यान शरद पवारांच्या फोटोचा वापर केला होता यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवारांच्या फोटोचा वापर न करता स्वतः आपला पक्ष वाढवावा अशी सूचना अजित पवारांना केली होती. आणि हेच सतीश आचार्य यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून दर्शविले आहे. यामध्ये दोन व्यंगचित्रे त्यांनी काढले आहेत एका व्यंगचित्रात शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या कडेवर घेतले आहे. तर दुसऱ्या चित्रात शरद पवारांना मागून खंजीर खुपसून त्यावर अजित पवार लटकत असलेले हे चित्र आहे. याच चित्रामध्ये मागून “स्वतःच्या पायावर उभा राहा.” असे शब्द दिले आहेत. की जे अजित पवारांना नक्कीच टोचणारे असतील परंतु सत्य आहेत.

त्याचप्रमाणे तिसऱ्या व्यंगचित्रात गौतम आदानी हा भांडवलदार आयटीत उभा राहिला आहे तर कडेला त्याच्यावर कोणताही हल्ला होऊ नये याची दक्षता घेणारे सरकार, भाजपा,पोलीस, सीबीआय , ईडी , आयटी , सेबी , गोदी मीडिया, आयटी सेल या सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून कडे करत अदानीला कव्हर दिले आहे . हे सर्व एकमेकांच्या हातात हात घालून ‘एक’ असल्याचे चित्र आहे तर गौतमादाने हा ‘सेफ’ असल्याचे दाखवण्यात आले आहे. “एक है तो सेफ है” हा नारा भाजपने नुकत्याच झालेल्या 2024 मधील विधानसभा निवडणुकीत दिला होता. ‘एक कोण आहे? ‘ व ‘सेफ कोण आहे ?’ याचे विश्लेषण या व्यंगचित्रातून आचार्यांनी अगदी काही सूचक व्यंगचित्रातून करविले आहे. व्यंगचित्रात दाखवताना कोर्टाचा हात दाखवत ” Count me in!” असे शब्द व्यंगचित्रात दिले आहेत.

यापूर्वीही सतीश आचार्य यांनी देशाच्या एकात्मतेची, निसर्ग प्रेमाची, आपुलकीची , बंधूभावतेची, समतावादी, मानवतावादी व्यंगचित्र जशी काढले आहेत तशीच शेतकरी आंदोलना तोडण्याचे काम करणारे नरेंद्र मोदी, महिला कुस्तीपटू यांचे वर आणलेला राजकीय दबाव, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बालकांना रिकाम्या पत्रावळीवर आशेवर ठेवलेले आहे अशा आशयाचे व्यंगचित्र; अशी एक ना अनेक राजकीय व्यंगचित्रे आजची तात्कालीन परिस्थिती दर्शविणारी काढली आहेत. आजची तत्कालीन परिस्थिती पाहयची असल्यास सतीश आचार्यांची व्यंगचित्रे पाहून आपल्याला देशाची आजची खरी परिस्थिती लक्षात यायला सोपे जाईल इतकी ती प्रभावी आहेत.

सध्या महाराष्ट्रात भाजप व त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे. गृहमंत्री पद हे स्वतः भाजपकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीसनकडे आहे अशावेळी व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना नोटीस देणे म्हणजे अभिव्यक्त होणाऱ्या कलाकारांना दाबण्याचा व लोकशाही संपवण्याचा हा भाजप व सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. सतीश आचार्य यांनी मात्र सरकारच्या मर्जीतल्या पोलिसांना अगदी एका व्यंगचित्रकाराने कमी शब्दात उत्तर द्यावे ते दिले आहे ते म्हणतात ” अरे वा मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था एवढी छान आहे की पोलिसांना आता व्यंगचित्राकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे.” ही आचार्यांनी दिलेली टिप्पणी सर्व काही बोलून जाते हे मात्र नक्की.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments