बार्शी – बार्शी येथील प्रवीण सुरेखा मच्छिंद्र मस्तुद लिखित “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या ई-पुस्तकाचे प्रकाशन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मराठी भाषेतला व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास एकत्रित रूपाने उपलब्ध नव्हता, तो या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध होईल. व्यंगचित्र पत्रकारिता क्षेत्रातील हे निराळे व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकाला पु.अ.हृो. सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रस्तावना तर मलपृष्ठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रा. सुरेश पुरी यांची पाठराखण आहे. हे पुस्तक “पुस्तक मार्केट” या अॅप वर किंवा वेबसाईटवर ई-बुक स्वरूपामध्ये मिळणार आहे. प्रवीण मस्तुद यांनी यापूर्वी व्यगचित्रविषयक एक पुस्तक प्रकाशित असून महाराष्ठ्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाने त्याासाठी अनुदान दिले होते.
या प्रकाशनासाठी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची कुलपती नियुक्त सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, कुलसचिव योगिनी घारे, डॉ. रवींद्र चिंचोलकर,डॉ. दत्तात्रय घोलप हे उपस्थित होते. या प्रकाशासाठी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके तसेच खजिनदार वर्षाताई ठोंबरे – झाडबुके श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, डॉ. जगन्नाथ पाटील, प्रा. डॉ. सुहास कुलकर्णी, प्रा. डॉ. अरुषा नंदीमठ, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, प्रा. तानाजी ठोंबरे, आई सुरेखा मस्तुद तसेच मित्र यांनी अभिनंदन केले आहे.