जि. प.च्या रानमसले येथील शाळेची नवी इमारत पाहून मुले आनंदली
सोलापूर¹ सोलापूर जिल्हा परिषदेच्या रानमसले येथील शाळेत नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी 15 जून 2024 रोजी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले .याप्रसंगी शाळेची नवी आणि सुसज्ज इमारत पाहून मुले आनंदून गेली
दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरु होते तेव्हा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची प्रथा आहे. यावर्षी १५ जूनपासून शाळेचे सत्र सुरू होतआहे. रानमसले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी शाळेचा पहिला दिवस विशेष आनंदाचा दिवस ठरला. कारण येथील शाळेसाठी नवी, सुसज्ज बांधण्यात आली आहे. शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने सोलापूर येथील लक्ष्मी हाइड्रॉलिक्सचे या कंपनीने सव्वा कोटी पेक्षा जास्त रुपयाचा सीएसआर निधी खर्च करून शाळेला नवी, सुसज्ज इमारत, अद्ययावत स्वच्छतागृहे व संरक्षक भिंत बांधून दिली. ही इमारत पाहून मुलांना खूप आनंद झाला.
चिंचोळी एमआयडीसी मध्ये मुख्यालय असलेली लक्ष्मी हाइड्रॉलिक्स ही भारतातील नामांकित इलेक्ट्रिक मोटर्स बनविणारी कंपनी आहे. मागील चाळीस वर्षांपासून कार्यरत असणारी ही कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्पादन करते. दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठीच्या निधीतून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. रानमसले येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा इमारत मोडकळीस आल्याचे समजल्यावर लक्ष्मी हाइड्रॉलिक्सचे प्रा .लि.चे व्यवस्थापकीय संचालक शरद कृष्ण ठाकरे यांनी या शाळेसाठी आपल्या मातोश्री स्व .शेवंता कृष्णा ठाकरे यांच्या स्मरणार्थ एक कोटी रुपये खर्च करून नवी, सुसज्ज हमारत बांधून दिली . शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी जि.प.मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाला.
नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर प्रथमच शाळेच्या सत्रास प्रारंभ होत आहे. शाळेच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात व चिमुकल्यांचा शाळेत पहिला दिवस असल्याने सदर इमारत व वर्गखोल्या सुशोभित केल्या.शाळेतील विद्यार्थी या नव्या सुसज्ज इमारतीत वावरताना आनंदी आणि उत्साही दिसत होते . गावातील शाळेला नवीन इमारत भेटल्याने गावकरीसुद्धा आनंदी होते. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर जमादार यांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.
शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मी हाइड्रॉलिक्स प्रा लि चे टेक्निकल डायरेक्टर आदित्य ठाकरे व कंपनीचे वरिष्ठ अधीकारी श्री अंबाजी नादरगी व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र चिंचोलकर होते. सर्व प्रमुख उपस्थितांचे स्वागत सरपंच श्री. मनोहर क्षीरसागर व मुख्याध्यापक श्री. परमेश्वर जमादार, यांनी केली. सर्व उपस्थित व शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकांनी मुलांचे स्वागत केले. प्रारंभी रानमसले जि.प शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेकडून धुमधडाक्यात दिंडी काढण्यात आले, फुले देऊन, चिमुकल्यांचे औक्षण करत तोंड गोड करून स्वागत करण्यात आले व मोफत शालेय पुस्तक वाटप करण्यात आले.