ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रकाशक बाबा भांड यांची ह्रद्य आठवण
छत्रपती संभाजीनगर – माझे शिक्षक आणि स्काऊट यामुळे लेखक बनलो तर नेमाडे सर आणि पत्नी आशा यांच्या प्रेरणेमुळे प्रकाशक बनलो अशी ह्रद्य आठवण ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रकाशक बाबा बांड यांनी सांगितली.
बाबा भांड यांची ही प्रदीर्घ मुलाखत प्रसिध्द मुलाखतकार शैलेंद्र टिकारिया यांनी त्यांच्या इन्स्पिरेशन द जर्नी ाांफ लाईफ या बेबसाईटवर घेतली आहे. यू ट्यूबवर खालील लिंकवर ही मुलाखत उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=_P08h3Lbg5k
या मुलाखतीत बाबा भांड यांनी सांगितले ‘’ पैठण तालुक्यातील वडजी हे माझे छोटेसे गाव, मात्र तिथे शाळा नसल्यामुळे मी पिंप्रीराजा येथे शालेय शिक्षण घेण्यासाठी आलोघेतले. तेथे आमचे मुख्याध्यापक शिरसीकर यांनी माझे वाचनाची आवड बघून मला पुस्तके वाचायला देण्यास सुरुवात केली व पुस्तक वाचल्यानंतर त्याविषयी काहीतरी लिही असे सांगितले. ‘मी कसा घडलो ‘ हे प्र. के. अत्रे यांचे पुस्तक मी वाचले आणि त्याविषयी लिहून माझ्या शिक्षकांना दाखविले. त्यावेळी त्यांनी तुझ्यात लेखनाचे गुण आहेत असे म्हटले. त्यामुळे मला लेखक व्हावे असे वाटू लागले .
लेखक होण्यास दुसरी महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे स्काऊट. मी स्काऊटमध्ये चांगला सहभाग घेतला, त्यावेळचे राष्ठ्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते स्काऊटमधील प्रेसिडेंट स्काऊट सर्वोच्च पदक व प्रमाणपत्र मिळाले. तसेच स्काऊटव्दारेच दहावीला असतानाच देशभरातून परदेशात पाठविण्यास पाच विद्यार्थ्यांची निवड झाली . त्यांचा मी संघनायक होतो .आम्हाला अमेरिका, जपान इत्यादी दहा देशात फिरण्याची संधी मिळाली. तेव्हा मला शिक्षकांनी सांगितले की दररोज जे पाहिले ते लिहून ठेवत जा. परत आल्यानंतर तेलेखन होते त्याचे पुस्तक करावे असे मला वाटले. महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा आम्हाला शिकवायला भालचंद्र नेमाडे सर होते .त्यांना मी माझे लेखन दाखवले तेव्हा ते म्हणाले ‘’ तुझ्याकडे लेखनाची चांगली शैली आहे, मात्र पुणे – मुंबईचे प्रकाशक तुझे पुस्तक प्रकाशित करतील याची खात्री नाही, त्यामुळे तुला जेव्हा शक्य होईल तेव्हा प्रकाशक हो’’ मला ज्या शाळेत नोकरी मिळाली तेथेच जीवनाची सहचारिणी मिळाली. ती माझी पत्नी आशा मला म्हणाली माझ्या पगारातून घर भागवू, तुम्ही नोकरी सोडून प्रकाशक व्हा . त्यामुळे माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले, मी लेखक आणि प्रकाशक बनलो.
कोरोना काळामध्ये माझ्या मुलाने ई-बुक ही संकल्पना काढली व त्यावेळी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हीच पुस्तके नंतर हार्डबाऊंडच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात विकली गेली . ऑनलाईन पुस्तके ही अडचण नाही तर संधी आहे, नव्या तंत्राकडे मी सकारात्मकतेने पाहतो – बाबा भांड
प्रकाशन व्यवसायामध्ये आतापर्यंत एकंदर 2500 पुस्तके प्रकाशित केली , यात मुलगी धारा , मुलगा साकेत यांनीही खूप मदत केली. नवे तंत्रज्ञान स्वीकारुन या क्षेत्रात पुढे जायला हवे . ऑनलाईन प्रकाशने पूरकच आहेत , त्यामुळे हार्ड बाऊंड पुस्त्कांचाही खप वाढतो . भारतात साहित्यिकाला जेवढा सन्मान मिळायला हवा तेवढा सन्मान मिळत नाही याची खंत वाटते- बाबा भांड
मोबाईलवर किंवा इतर कुठल्या तांत्रिक साधनाच्या माध्यमातून पुस्तक वाचण्यापेक्षा हातात पुस्तक घेऊन ते वाचण्याचा आनंद हा अवर्णनीय असतो. प्रकाशन क्षेत्रामध्ये नव्या पिढीने यावे. खेड्यातील बाजार आणि जत्रा या ठिकाणी जर पुस्तके विकली तर मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री वाढू शकते – बाबा भांड
प्रकाशन व्यवसाय व्यतिरिक्त माझ्या गावाच्या आसपासच्या भागांमध्ये जलसंधारणाची कामे करण्याचे प्रयोग केला त्यासाठी त्यावेळचे औरंगाबादेतील आय.ए.एस.अधिकारी भूषण गगराणी यांनी मोठी मदत केली.माझ्या शेतावर मागील 30 वर्षांपासून गरीब,अपंग आणि मूकबधीर मुलांसाठी शाळा काढली आहे. ही काही चांगली कामे करता आली. एस.एस.वाय.च्या कामामुळे तब्येत छान राहिली. – बाबा भांड
खरे तर मी लेखक, इतिहासकार नाही. मात्र स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीकारकारकांना मदत करणा-या महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या विषयी केलेल्या लेखनामुळे वास्तव इतिहासाचे लेखन करण्याची , नवे पैलू समोर आणण्याची संधी मला मिळाली, असे लेखन अनेक माहान व्यक्तींबाबत व्हायला हवे – बाबा भांड
तरुण पिढीने मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे खूप कष्ट केले पाहिजेत, तरच ती स्वप्न पूर्ण होऊ शकतात. एखादा पक्षी जेंव्हा हवेत उडतो तेव्हा तो आपल्या पंखात बळ निर्माण करतो. तसे आपण करायला हवे.- बाबा भांड