सोलापूर – तृतीयपंथी समाजातून सरपंच होण्याचा भारतात पहिला मान मिळवूनही समाज स्वीकारत नाही अशी खंत सोलापूर जिल्हयतील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील माऊली ( ज्ञानेश्वर ) कांबळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील तृतीयपंथीयांसाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना व्यक्त केली.
30 जानेवारी 2025 रोजी यरिषदेच्या पहिल्या सत्रात माऊली कांबळे बोलत होत्या. या सत्रात पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सचिन वायकुळे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अपूर्वाई मल्टीमिडिया हाऊसचे संस्थापक डॉ. रवींद्र चिंचोलकर होते.
माऊली कांबळे यांनी अनुभव सांगताना पुढे म्हणाल्या की माझ्या घरात चार सख्खे व चार चुलत असे आठ भाऊ होते. वयाच्या चौदाव्या वर्षी मला माझ्या वेगळेपणाची जाणीव झाली. मी साडी नेसल्यावर माझ्या भावांना लोक चिडवत , त्यामुळे मी घर सोडले. सरपंच झाल्यावरही लोकांनी पत्रिकेवर नाव टाकले नाही. मी स्वबळावर काही मिळविले म्हणून आता मला आर्थिक अडचणी नाहीत. माझा कुठला स्वार्थ नसल्याने गावाचा विकास करण्याचाही प्रमाणिक प्रयत्न केला. मात्र तृतीयपथींयांच्या अडचणी कायम आहेत असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी बोलताना पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन वायकुळे म्हणाले की , तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे त्यामुळे तृतीय पंथी समाजातील व्यक्ती माझ्या आवाहनाला चागला प्रतिसाद देतात. तृतीय पंथीयांना आधार कार्ड मिळवून देणे, विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याचे कार्य मी केले आहे. तृतीय पंथी व्यक्ती देखील माणूसच आहेत. त्यांना आपण समजून घेतले तर त्यांचा विश्वास आपणाला लाभतो. माझ्या या काामात माझे ााईवडील, पत्नी यांचेही सतत प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र चिंचोलकर म्हणाले की, सोलापूर जिल्हयात तृतीय पंथीयाच्या दृष्टीने चांगले कार्य सुरु आहे. सोलापूर जिल्हयातील तरंगफळ येथील माऊली कांबळे यांना लोकांनी निवडून देऊन सरपंच केले. सचिन वायकुळे बार्श३चे, तेही सोलापूर जिल्हयात तृतीयपंथीयांसाठी मोठे कार्य करीत आहेत. ब्रिजमोहन फोफलिया सोलापूरचे, त्यांनीही तृतीयपंथीयांसाठी कार्य सुरु केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाने तृतीयपंथीयांसाठी आंतरराष्ट्रीाय परिषद आयोजित केली. केवळ परिषद घेऊन न थांबता तृतीयपंथीयांना सहाय्य करण्यास कायमस्वरुपी केंद्र सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
या सत्राच्या प्रारंभी डॉ. ज्ञानेश्वरी हजारे यांनी परिचय करुन दिला. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. गौतम कांबळे , डॉ. अंबादास भासके , डॉ. तेजस्विनी कांब्ळे, प्रा. विठ्ठल एडके, प्रा. ऋषिकेश मंडलिक , डॉ. मधुाकर जक्कन ाादींची उपस्थिती होती. 31 जानेवारी 2025 रोजी या परिषदेचा समारोप होत आहे.