Wednesday, February 5, 2025
Homeअर्थकारणसायबर गुन्ह्याबाबत डिजिटल साक्षरता हवी : डॉ. ककडे

सायबर गुन्ह्याबाबत डिजिटल साक्षरता हवी : डॉ. ककडे

कोल्हापूर, -: प्रत्येकांनी डिजिटल साक्षरता झाल्यास सायबर गुन्हे टाळता येतील. त्यासाठी सायबर गुन्ह्याबाबत डिजिटल साक्षरता असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व ‘सेबी’चे नामिका साधन तज्ञ डॉ. विजय ककडे यांनी केले

.शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘ वित्तीय साक्षरता आणि सायबर क्राईम जनजागृती’ या विषयावरील आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक डॉ. कृष्णा पाटील होते. यावेळी उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे उपस्थित होते. डॉ. ककडे म्हणाले, सर्वांना वित्तीय साक्षरतेबाबत जनजागृती असली पाहिजे. सायबर गुन्ह्याबाबत सर्वांनी दक्ष असणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सुरक्षित गुंतवणूक करणे, गुंतवणुकीचे सर्व नियम व अटी माहीत असणे आवश्यक आहेत. गुंतवणूक परतावा जास्त आहे, म्हणून कोठेही गुंतवणूक करू नये. ती गुंतवणूक सुरक्षित जास्त व परतावा मागील तेव्हा मिळेल. याकडे पाहणे आवश्यक आहे. आपण अर्थ साक्षरता असेल तर ऑनलाईन फसवणूक होणार नाही. जास्त सुरक्षिततेसाठी मॅच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. वाढत्या वयाबरोबर पैशातील रूपांतर मालमत्तेत जास्त असले पाहिजे. याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असेही डॉ.ककडे म्हणाले.डॉ. प्रकाश बेलीकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रसाद दावणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. संजय चोपडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments