मनिषा चिंचोलकर या सोलापूर येथील गृहिणीने रांगोळी काढणे शिकू इच्छिणा-यांसाठी ‘तुलसी रंगोली ‘नावाचे यू ट्यूब चॅनल सुरु केले आहे. या चॅनलची माहिती देताना त्यांनी सांगितले की , आपणाला सहजपणे चांगली रांगोळी काढता यावी अशी अनेकांची इच्छा असते ,मात्र रांगोळीचे क्लासेस लावल्याशिवाय रांगोळी शिकता येणार नाही अअसे त्यांना वाटत असते .खरेतर रांगोळी काढण्यासाठी क्लास लावण्याची काहीही आवश्यकता नाही. कोण्राीही काढलेली रांगोळी पाहृुन तशी रांगोळी काढण्याचा सराव केला तर चांगली रांगोळी कोणालाही काढता येणे सहज शक्य आहे .
वेळ – प्रसंगानुसार घरासमोर छोटीशी रांगोळी काढता येणे किंवा महत्त्वाच्या प्रसंगी मोठी विशेष रांगोळी काढता येणे हे प्रत्येकाला शक्य आहे . मी तुलसी रंगोली यूट्यूब चॅनल सुरु करुन अगदी सोप्या रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत. कोणालाही अशा रांगोळी काढणे शक्य आहे, मात्र थोडी आवड असणे आणि थोडासा वेळ काढणे या दोन गोष्टींची आवश्यकता आहे.
त्लाुलसी रंगोली यू ट्यूब चॅनल सुरु करण्याची कल्पना कशी सुचली हे सांगताना मनिषा विंचोलकर म्हणाल्या यू ट्यूब चॅनलवर रांगोळी कशी दाखवायची ते ठाऊक नव्हते.माझी कन्या रविनिशा एक दिवस म्हणाली आई रोज इतक्या छान रांगोळ्या काढतेस, मग यू ट्यूबवर का टाकत नाहीस?. मी तिला म्हटले , मला त्यातले काही कळत नाही. ती म्हणाली मी बाकी सारे करते, तू फक्त रांगोळी काढ . अशा रितीने कन्येच्या मदतीने तुलसी रांगोली चॅनल्ची सुरुवात झाली. माझ्या तुलसी रंगोली चॅनेल ची लिंक खाली देत आहे. या लिंक वरुन त्यावरील रांगोळ्या पाहा. आवडल्यास जरुर कळवा. आषाढी यात्रेनिमित्त काढलेल्या रांगोळीची लिंक दिली आहे. ही आणि इतर रांगोळ्या पाहा, काही सूचना आपल्या ते जरूर कळवाव्यात असे मनिषा चिंचोलकर यांनी सांगितले .