शिर्डी – प्रख्यात लेखिका व समाजसेविका सुधा मूर्ती यांच्या हस्ते शनिवार १ जून २०२४ रोजी शिर्डी येथे ‘शिर्डी गॅझेटिअरच्या’ इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन झाले. प्रमोद आहेर यांनी वास्तव इतिहास मांडाला असल्याचे कौतुक डॉ. सुधा मूर्ती यांनी याप्रसंगी केले.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी सिंंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला शालिनीताई राधाकृष्णजी विखे पाटील, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद, अ.नगर, सिद्धारामजी सालीमठ (आयएएस ) जिल्हाधिकारी अ.नगर तथा सदस्य, तदर्थ समिती, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, गोरक्षजी गाडीलकर (आयएएस) मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, आदरणीय बाळासाहेबजी कोळेकर, अप्पर जिल्हाधिकारी, शिर्डी, तुकारामजी हुलवळे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्यासह साईनगरीचे मान्यवर उापस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी गोरक्षजी गाडीलकर म्हणाले प्रमोद आहेर यांनी या गॅझेटियरमध्ये साईबाबांच्या जीवनातील अनेक प्रसंग मांडले आहेत. तसेच साई संस्थानचीही माहिती दिली आहे. हा ग्रंथ सर्वांसाठी उाप्युक्त ठरेल . शालिनीताई राधाकृष्णजी विखे पाटील म्हणाल्या की प्रमोद आहेर यांचे सिर्ढीसाठीचे हे योगदान महत्वपूर्ण आहे. लेखक प्रमोद आहेर यांनी गॅझेटिअर लेखनासाठी केलेल्या य्रयत्नांची माहिती दिली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी सिंंग अध्यक्षीय भाषणात म्हणाले की , मला या साईबाबांच्या या पावन भूमीत या सोहळ्याला उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो. प्रमोद आहेर यांनी या गॅझेटियरसाठी मोठे संशौधन केल्याचेही ते म्हणाले.
साईसमाधी मंदिरालगत असलेल्या शताब्दी मंडपात हा सोहळा झाला. अनेक दिवसांपासून शिर्डी व साई संस्थानचा कधीही प्रकाशित न झालेला व दुर्लक्षित असलेला इतिहास संदर्भासहित अतिशय सोप्या मराठी भाषेत ‘शिर्डी गॅझिटीयर’ या प्रमोद आहेर यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला .त्याच ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन आज करण्यात आले.