न्यूयॉर्क – सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून त्यांचे सध्या वास्तव्य असलेल्या स्थानकावरून सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यासाठी ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी पोहोचले आहे .
आठ महिन्यांपासून अडकलेले हे अंतराळवीर या यानातून फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परतणार आहेत . नासा आणि स्टारलायनरला यासाठी एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या प्रतिस्पर्धी कंपनीची मदत घ्यावी लागती
या मोहिमेला क्रू-9 मिशन असे नाव देण्यात आले आहे. . त मस्क यांच्या कंपनीचे फाल्कन – 9 रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट रवाना करण्यात आले आहे. नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेही या यानासोबत होते. अंतराळयानात एकूण चार जागा असून सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांच्यासाठी दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणणारे स्पेस एक्सचे ड्रॅगन यान आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले गेले आहे. अमेरिकन अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांचे स्वागत सुनीता विल्यम्स यांनी केले. यासोबतच सुनीता आणि बुच फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परततील. अंतराळ स्थानकावर आधीपासून 9 अंतराळयात्री होते आता स्पेस स्टेशनवर एकूण 11 लोक आहेत .
फाल्कन 9 काय आहे?
फाल्कन 9 हे दोन-मार्गी पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट आहे, जे एलॉन मस्कच्या कंपनी स्पेस एक्सने पृथ्वीच्या कक्षेत आणि तेथून प्रवास करण्यासाठी डिझाइन केले आहे. फाल्कन 9 हे जगातील पहिले पुन्हा वापरता येणारे ऑर्बिट क्लास रॉकेट आहे. हे रॉकेट पुन्हा वापरता येत असल्याने, अंतराळ प्रवास खूपच किफायतशीर आहे. स्पेसएक्स वेबसाइटवर दिलेल्या तपशीलानुसार, फाल्कन 9 रॉकेट 70 मीटर लांब आणि 549,054 किलो वजनाचे आहे. हे कमी पृथ्वीच्या कक्षेत 22 हजार 800 किलो वजन उचलू शकते.फेब्रुवारी 2025 पर्यंत हे अंतराळयात्री स्पेस स्टेशनवरच राहतील.
.