वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळयात्री सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुव विल्मोर जर पृथ्वीवर येत्या बारा दिवसांत सुनीता पृथ्वीवर परत येऊ शकले नाही, तर यापुढच्या काळाते मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 24 जून 2024 रोजी पृथ्वीवर परत येणार होते. मात्र दोन महिन्यांहून अधिक काळ ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत.अंतराळ स्थानकात मध्ये वाढलेल्या मुक्कामामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.अंतराळ स्थानकात मर्यादित संसाधने संपत आहेत आणि नासा दुसऱ्या मोहिमेसाठी दुसरे अंतराळयान पाठवू शकत नाही कारण त्यासाठी अंतराळ स्थानकावर जागा उपलब्ध नाही.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना इतक्या विस्तारित कालावधीसाठी अंतराळ स्थानकात राहायचे नव्हते आणि विलंब नासालाही महागात पडला आहे. स्टारलाइनरच्या समnerमुळे, नासा तिला अंतराळ यानाकडे परत जाण्यास सांगू शकत नाही, कारण यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो.
पार्श्वभूमी
अंतराळयात्री सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग अंतराळ यानातून अंतराळ मोहिमेला निघाले आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. एक आठवडा किंवा त्यापेक्षा थोडा अधिक काळ अंतराळात राहून ते परतणार होते. मात्र त्यांचे यान बिघडल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच थाबावे लागले आहे. आता चार आठवडे झाले आहेत , सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर नक्की कधी परततील ते ठरवता येत नाही. नासा आणि बोईंग यानाच्या दुरुस्तीचा प्रयत्न करीत आहेत. परतीच्या तीन संभाव्य तारखा आतापर्यंत रद्द झाल्या आहेत. सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर नक्की परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
हीलियम गळतीमुळे बिघाड
सुनिता विल्यम्स आणि बुव विल्मोर यांच्या अंतराळ यानातील बिघाडास हीलियम गळती आणि थ्रस्टर आउटेजच्या कारणीभूत आहे.
आगामी मोहिमा आणि संसाधनांवर प्रभाव
सुनीता विल्यम्स लवकरचअंतराळ स्थानकावरून परत न आल्याने , 18 ऑगस्ट 2024 ला चार नवीन अंतराळवीांचे आगामी उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे. अंतराळ स्थानकातली संसाधने आधीच त्यांच्या मर्यादेपर्यंत उपयोगात आणली आहेत. अंतराळवीरांना दोन अतिरिक्त महिने राहण्याची तरतूद अंतराळ स्थानकावर करण्यात आल्याने या संसाधनांवर भार पडला आहे. जास्त काळ अंतराळ स्थानकावर राहिल्याने या अंतराळवीरांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.
स्टारलायनरला आशा
अंतराळयानाच्या थ्रस्टर्स आणि हेलियम प्रणालीची दुरुस्ती रिटर्नसाठी महत्त्वाची आहे. त्यात काही अनियमितता आढळून आल्यास अंतराळवीरांना धोका होऊ शकतो. त्यामुळे नासा आणि बोइंगचे अभियंते सध्या कॅप्सूलच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त आहेत. दुरुस्ती टप्प्यात असून अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतील असा विश्वास स्टारलायनरतर्फे व्यक्त केला जात आहे.
नासा ने मंगळवारी सांगितले की ते स्पेस एक्स चे चार अंतराळवीरआहे, 18 ऑगस्ट 2024 रोजी अंतराळात जाणार होते ते आता 24 सप्टेंबरला जातील.