आरोग्य सेवा क्षेत्रातील 99 टक्के जाहिराती अयोग्य
मुंबई – ग्रााहकांपर्यंत पोहोचणा-या जाहिरातींपैकी केवळ दोन टक्के जाहिराती योग्य आहेत . आरोग्य सेवा क्षेत्रातील तर अवघ्या एक टक्का जाहिराती योग्य आहेत. यातील बहुतांश जाहिराती डिजिटल मिडियातून दिल्या गेलेल्या आहेत . याचाच अर्थ आरोग्य सेवा क्षेत्रतील 99 टक्के जाहिराती अतिरंजित अथवा ग्रााहकांची दिशाभूल करणा-या आहेत असा धक्कादायक निष्कर्ष ऍडव्हर्टायजिंग कौन्सिल ऑफ इंडिया ( ए.एस.सी.आय. ) या संस्थेच्या 2023-24 च्या वार्षिक अहवालातील आकडेवारीवरुन निघतो.
ए.एस.सी.आय. ही संस्था जाहिरातींच्या क्षेत्रातील स्वयं-नियामक संस्था आहे. जाहिरातींबाबत आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेने 2023-24 चा वार्षिक अहवालातील काही महत्वाच्या मुद्द्यांची आकडेवारी संकेतस्थळावर दिली आहे.
ए.एस.सी.आय. ने एकंदर 8229 जाहिरातींची तपासणी केली. त्यातील 88 टक्के जाहिरातींमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. केवळ 2 टक्के जाहिरातीच योग्य होत्या असे यात आढळले. यातील 85 टक्के जाहिराती डिजिटल माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
एकंदर जाहिरातीत सर्वाधिक 19 टक्के जाहिराती आरोग्य सेवा क्षेत्राच्या आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रातील 1575 जाहिराती ए.एस.सी.आय. ने तपासल्या. त्यापैकी 1559 (99 टक्हिके) जाहिरातीत बदल गरजेचे होते. या जाहिरातींमधील 1249 जाहिराती कायद्याचे (डी. एम. आर. कायदा) उल्लंघन करणा-या आढळल्या. उर्वरित 326 जाहिरातींंपैकी 190 जाहिराती दवाखाने/रुग्णालये/वेलनेस सेंटरच्या असून त्या सेवा , काळजी आणि दीर्घकालीन आजारांवरील उपचारांबद्दल दिशाभूल करणारे मोठे दावे करणा-या आढळल्या. 129 जाहिराती फार्मा कंपन्यांकडून केलेल्या आहेत त्या मोठे दावे करणा-या आहेत. आरोग्य सेवा क्षेत्रातील या जाहिरातींपैकी 86% जाहिराती डिजिटल माध्यमावर दर्शविल्या गेल्या .
दिशाभूल करणा-या जाहिरातीत दुसरा क्रम सट्टेबाजीला प्रोत्साहन देणा-या जाहिरातींचा लागतो. एकंदर जाहिरातीत यांचा वाटा 17 टक्के आहे. या क्षेत्रातील 1336 जाहिरातींत बदल गरजेचे होते. सर्वाधिक उल्लंघन करणारे क्षेत्र म्हणून वैयक्तिक काळजी ( पर्सनल केअर) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात 13 टक्के जाहिराती दिल्या गेल्या. त्यातील 1064 पैकी 1051 जाहिरातीत बदल गरजेचे होते. चौथ्या क्रमांकावर पारंपरिक शिक्षण क्षेत्र राहिले . या क्षेत्राचा जाहिरातींचा वाटा टक्के आहे. या क्षेत्रातील 962 जाहिराती बदाल गरजेचे होते. पाचवा क्रम अन्न आणि पेय पदार्थाचा आहे. यातील जाहिरातीचा वाटा 10 टक्के आहे. या क्षेत्रातील 783 जाहिरातीत बदल गरजेचे होते. स्थावर मालमत्ता क्षेत्रााचा वाटा सात टक्के आहे. या क्षेत्रातील 558 जाहिरातीत बदल गरजेचे होते. गेमिंग क्षेत्रातील 492, फॅशन क्षेत्रातील 415, शिक्षण – तंत्रज्ञान क्षेत्रातील 141, तर बालसंगोपन क्षेत्रातील 90 जाहिरातील बदल गरजेचे होते.
सर्वच क्षेत्रातील 98 टक्केपेक्षा अधिक जाहिराती बदल आवश्यकअसतानाही बदल न करता दिल्या आहेत. त्यामुळे दिशाभूल करणा-या जाहिरातींचे प्रमाण चिंताजनक आहे.
एकंदर जाहिरातींप्ैकी 3200 जाहिराती कायद्याचे थेट उल्लंघन करणा-या आढळल्या.
282 जाहिरातदारांकडून 1131 दिल्या गेल्या, या जाहिराातींमधुनही कायद्याचे
उल्लंघन होते असे दिसून आले/