कोईमतूर – खादय पदार्थावरील जीएसटीवरून उत्तर – दक्षिण वादाची झलक नुकतीच पाहायला मिळाली .
जीएसटी बाबत उतर दक्षिण भारतात फरक केला जात असल्याचे एका हॉटेल मालकाने थेट भारताच्या अर्थमंत्र्यांना सुनावल्याची घटना तामिळनाडूत घडली .
11 सप्टेंबर रोजी सीतारामन यांच्या समवेत झालेल्या उदयोजकांच्या बैठकीत, तामिळनाडू हॉटेल असोसिएशनचे मानद अध्यक्ष श्रीनिवासन यांनी ही टिप्पणी केली .श्रीनिवासन म्हणाले “एका महिलेने मला विचारले ” भारतात उत्तरेतील लोक अधिक मिठाई खातात आणि दक्षिणेतील लोक मसालेदार पदार्थ अधिक खातात .मिठाईवर 5 टक्के जीएसटी आहे मात्र मसालेदार ( नमकीन ) पदार्थावर 18 टक्के जीएसटी आहे असे का? ”
दुसरे उदाहरण देताना श्रीनिवासन म्हणाले बनपाववर जीएसटी , मस्का (क्रीम) वर मात्र 18 टक्के जीएसटी आहे .आम्ही हॉटेलमध्ये ग्राहकाला मस्का बनपाव देतो . त्यावर 18 टक्के जीएसटी लागतो . ग्राहक म्हणतो बनपाव . वेगळा दया आणि मस्का वेगळा द्या , मी तो पावावर लाऊन खाईन , म्हणजे जीएसटी कमी लागेल. जीएसटीत अशी विसंगती आहे .समस्या अशी आहे की प्रत्येक वस्तूवर जीएसटी वेगळ्या प्रकारे लागू केला जातो .
श्रीनिवासन पुढे म्हणाले आम्हा दक्षिणतेल्या लोकांना कॉफी , गोड पदार्थ आणि मसालेदार पदार्थ एकत्र खाण्याची सवय आहे . प्रत्येकावर वेगवेगळा आमचा कॉम्प्युटरही बिल बनवताना गोंधळून जातो . कृपा करा आणि खादय पदार्थां वरील जीएसटीत भेदभाव न करता एकच दर ठेवा .
श्रीनिवासन यांनी अर्थमंत्र्यांना थेट ऐकवण्याचे धारिष्ट्य दाखविल्याबद्दल अनेकजण त्याचे कौतुक करीत आहेत .दुसरीकडे एका हॉटेल मालकाने थेट आपल्या पक्षाच्या अर्थमंत्र्यांना असे काही सुनवावे ही बाब भाजप कार्यकर्त्यांना रुचली नाही . अस्वस्थ उत्साही कार्यकर्त्यांनी अर्थमंत्र्यावर झालेली ही टीका सहन न झाल्याने श्रीनिवासन यांनी दुसऱ्या बैठकीत अर्थमंत्र्यांची माफी मागितली अशा बातम्या व व्हिडिओ पसरविण्यास सुरुवात केली .
अखेरीस, एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी ब्रिटनमध्ये तीन महिन्यांसाठी गेलेले भाजप प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई यांना ब्रिटनमधून त्यांच्या पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.