कंत्राटदारांचा संप करण्याचा इशारा
मुंबई – महाराष्ट्र सरकरकडे कंत्राटदारांची 67 हजार कोटींची रक्कम मागील अडीच वर्षांपासून थकली आहे, वारंवार मागणी करुनही लक्ष दिले जात नसल्याने संप करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स फेडरेशन ऍण्ड इंजिनिअर्स असोसिएशनने दिला आहे.
आम्ही सर्व कामे पूर्न करुन दिली , मात्र महाराष्ट्र सरकार आमची बिले देत नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स खूप अडचणीत आले आहेत.
या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील पावलांचे नियोजन करण्यासाठी कंत्राटदार, विकासक, अभियंते आणि कामगार संघटनांचा समावेश असलेली एक ऑनलाईन बैठक 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स फेडरेशन अँड स्टेट इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले की, पेमेंटला 2.5 वर्षांहून अधिक काळ विलंब झाला आहे. भोसले यांच्या म्हणण्यानुसार, विविध विभागांसाठी एकूण 76,000 कोटी रुपये प्रलंबित आहेत.मात्र, राज्य सरकारने महिला, युवक, शेतकरी, विद्यार्थी आणि आदिवासींच्या फायद्यासाठी योजना आणल्या आहेत, आमची बिले अडली आहेत.
कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी कंत्राटदारांना संबंधित मंत्र्यांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विविध विभागांना निधी दिला असून प्रलंबित देयके योग्य वेळी मंजूर केली जातील, असे आश्वासन दिले.
या वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांची घोषणा केली होती. महसूल तूट 20,151 कोटी रुपये, वित्तीय तूट 1.1 कोटी रुपये आणि राज्याचा कर्जाचा बोजा 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.