Sunday, December 22, 2024
Homeकलारंजन' लापता लेडीज ' चित्रपट पाहिला नसल्यास काय पाहिले?

‘ लापता लेडीज ‘ चित्रपट पाहिला नसल्यास काय पाहिले?

ज्या चित्रपटात मोठे कलाकार नाहीत , भव्य – दिव्य सेट नाहीत, महागडे पोशाख नाहीत, परदेशातील चित्रिकरण नाही, मारधाड नाही,  देहप्रर्द्शन नाही अशा चित्रपटाकडून आपण फारशा अपेक्षा ठेवत नाही. मात्र हे सारे असूनही  चांगले  कथानक आणि उत्कष्ट दिग्दर्शनाच्या  आधारे एखादा  चित्रपट आपणाला मोहवून टाकू शकतो याचे उदाहरण म्हणजे ‘लापता लेडीज’ हा चित्रपट आहे.  कथालेखक विप्लव देसाई यांची हलकी-फुलकी मात्र आशयघन कथा आणि  किरण राव यांचे सुरेख दिग्दर्शन यामुळे  ‘लापता लोडिज’ या चित्रपटाने किमया केली आहे. 

अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक सांगत , हा सिनेमा नकळत समाज प्रबोधन करतो हीच याची खासियत आहे .आमिर खान प्रॉडक्शनच्या या चित्रपटात रवी किशन वगळता एकही मोठा कलाकार नाही. ( रवी किशन हा भोजपुरी चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार आहे , मात्र हिंदी चित्रपट रसिकांना फारसा ठाऊक नाही. ).या चित्रपटाच्या कथानकात निर्मल प्रदेश अशी काल्पनिक भूमी दाखवली असली तरी भारतातील कोणत्याही राज्यात घडू शकते असे हे कथानक आहे. कथानकाची सुरुवात मजेशीर होते. नुकतेच लग्न झालेले दोन जोडपे ट्रेनमध्ये चढतात. दोन्ही नववधूंच्या चेहऱ्यावर घुंगट असते. ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत एक नवरदेव चुकून दुस-याच नवरीचा हात धरुन खाली उतरतो. त्यानंतर होणारी धमाल प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवी अशी आहे.यातील कथानक गतीने पुढे जात राहते आणि चित्रपट संपेपर्यंत वास्त्ववाचा आभास निर्माण करतात. कोणतीही व्यक्तीरेखा अथवा प्रसंग अतिशयोक्त नाही. कथानक शेवटपर्यंत आपली उत्सुकता वाढवित नेते. 

यातील सर्व पात्र , प्रसंग वास्तवात कोणत्याही खेड्यात आढळू शकतील असे आहेत. नाही. चित्रपट तुम्हाला खूप रडवत असेल तर रुमाल घ्या, तोही जास्तीचा. स्पर्श श्रीवास्तव याआधी जामतारा या वेब सीरिजमध्ये दिसला होता पण हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे आणि तो खूप चांगला आहे. खेड्यातील मुलाची देहबोली त्यांनी अप्रतिम शैलीत टिपली आहे. रवी किशन यात स्थानिक पोलिस अधिका-या भूमिकेत आहे. भ्रष्ट असलेला पण माणुसकी असलेला पोलिस अधिकारी रवी किशन यांनी ज्या पध्द्तीने रंगविला आहे, त्याचे लाजवाब असेच वर्णन केले जाऊ शकते.चित्रपट संपला तरी रवी किशनने रंगवलेला पोलिस अधिकारी सततआठवत राहतो.   याशिवाय यातील चार प्रमुख पात्रे म्हणजे , दोन नवविवाहित जोडपी . नितांशी गोयलने फुलची भूमिका साकारली आहे. तिची निरागसता  मन जिंकते. प्रतिभा रांटाने आत्मविश्वास असलेल्या, शिकलेल्या, स्वतःचे निर्ण स्वतः घेणा-या नववधूच्या पात्रात जीव ओतला आहे. दीपक (स्पर्श श्रीवास्तव) ग्रामीण भागातील असूनही विचार आणि कृतीत प्रगतीशील आहे, तर प्रदीप (भास्कर झा) हा पारंपरिक नवरदेवाच्या मानसिकतेत जगणारा आहे. हरवलेल्या दोन्ही नववधू दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. अशावेळी त्यांना भेटणारी माणसे त्यांना मदतच करतात, समजून घेतात . चित्रपटात खलनायक आणि त्याचे साथीदार घूसडून संपूर्ण सिनेमात मारधाड आणि देहप्रदर्शन घडविण्याचा बॉलिवूडच्या यशस्वी फंड्याकडे , हा चित्रपट ढूंकूनही पाहात नाही. 

किरण राव यांनी चित्रपटातील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर चांगले काम केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला तिच्या रुपाने चांगली दिग्दर्शिका लाभाली आहे. यापुढच्या काळात तिच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहील असा स्वतःचा प्रेक्षकवर्ग तिने मिळविला आहे. राम संपत यांच्या संगीतामुळे हा चित्रपट आणखी सुखावह होतो. आता नेटफ्लिक्सवरही हा चित्रपट उपलब्ध आहे. 

आवर्जून पाहायलाचा हवा आणि कुटुंबातील सर्वांना दाखवायला हवा असा हा चित्रपट आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments